सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; २९ डिसेंबरला पुण्यात करणार हल्लाबोल पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:18 PM2017-11-28T13:18:03+5:302017-11-28T13:22:35+5:30

पुण्यात शहर राष्ट्रवादीने राज्य सरकारच्या विरोधात बुधवारी (२९ डिसेंबर) हल्लाबोल पदयात्रा आयोजित केली आहे. पक्षाचे नेते अजित पवार या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

ncp aggressor against the state government; rally on 29th December in Pune | सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; २९ डिसेंबरला पुण्यात करणार हल्लाबोल पदयात्रा

सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक; २९ डिसेंबरला पुण्यात करणार हल्लाबोल पदयात्रा

Next
ठळक मुद्देराज्य सरकार भरकटले आहे. सत्ता राबवायची कशी हे त्यांना समजेनासे झाले आहे : वंदना चव्हाण२९ डिसेंबरला अलका चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणार पायी मोर्चा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक धोरण स्वीकारले असून त्याचाच एक भाग म्हणून १ ते १२ डिसेंबर दरम्यान यवतमाळ ते नागपूर अशी १५३ किलोमीटरची हल्लाबोल पदयात्रा काढण्यात येणार आहे. पुण्यातही शहर राष्ट्रवादीने यानिमित्त बुधवारी (२९ डिसेंबर) हल्लाबोल पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. पक्षाचे नेते अजित पवार या पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
पक्षाच्या शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण यांनी ही माहिती दिली. राज्य सरकार भरकटले आहे. सत्ता राबवायची कशी हेच त्यांना समजेनासे झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येक समाजघटकाला अहितकारक असे निर्णय त्यांच्याकडून घेण्यात येत आहेत. सरकारच्या या अनागोंदी कारभाराचा निषेध म्हणून राष्ट्रवादीच्या राज्य शाखेने नागपूर येथे हल्लाबोल मोर्चाचे आयोजन केले आहे. पुण्याचाही त्यात सहयोग असेल. त्यासाठीच २९ डिसेंबरला अलका चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. तिथे जिल्हाधिकारी सौरभ राव यांना निवेदन देण्यात येईल अशी माहिती चव्हाण यांनी दिली. नागरिकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. 

Web Title: ncp aggressor against the state government; rally on 29th December in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.