माहिती अधिकाराचा दुरुपयोग होतोय - राहुल कुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:41 AM2018-12-25T00:41:09+5:302018-12-25T00:41:17+5:30

सध्याच्या परिस्थितीत माहिती अधिकाराचा दुरुपयोग होत असून, माहितीच्या अधिकाराखाली एखादी माहिती मिळवायची व भीती दाखवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम होत आहे.

Misuse of information authority - Rahul Kul | माहिती अधिकाराचा दुरुपयोग होतोय - राहुल कुल

माहिती अधिकाराचा दुरुपयोग होतोय - राहुल कुल

Next

दौंड - सध्याच्या परिस्थितीत माहिती अधिकाराचा दुरुपयोग होत असून, माहितीच्या अधिकाराखाली एखादी माहिती मिळवायची व भीती दाखवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम होत आहे. ही बाब निश्चितच समाजाच्या दृष्टिकोनातून गंभीर असल्याचे मत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले.
दौंड येथे स्वस्त धान्य दुकानदाच्या मेळाव्यात ते बोलत होते. माहितीच्या अधिकारात माहिती नेमकी कशासाठी घेतली. त्या माहितीचा समाजासाठी कितपत उपयोग झाला. याची शहनिशा शासन पातळीवरुन झाली पाहिजे. परंतु सध्याच्या परिस्थितीत माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा सुळसुळाट झाला असून हे कार्यकर्ते केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी माहिती अधिकाराचा उपयोग करीत असल्याची माहिती शासन दरबारी पुढे आली आहे.
ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया म्हणाले की, रेशन दुकानदारांना शासनाच्या विविध नियमांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच तक्रार दारांची संख्या वाढली आहे.
जो मुळात भ्रष्ट आहे तोच तक्रार करतो आणि पैसे घेतल्यानंतर तक्रारी मागे घेतो याची चौकशी करण्यासाठी समाजाने पुढे येणे गरजेचे आहे. तहसीलदार बालाजी सोमवंशी म्हणाले की, लाभार्थींच्या व दुकानदारांच्या तक्रारी सातत्याने शासनाकडे येत असतात. परंतु शासनाने ई पॉस मशीनचा वापर सुरु केल्यामुळे स्वस्त धान्य दुकानाराचे अधिकारच कमी झाले आहे तरी देखील रेशन दुकानदारांना जी काही मदत करता येईल. यावेळी दौैंड तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष राजेश पाटील, नायब तहसीलदार आखाडे, पुरवठा निरीक्षक गिरीश भालेराव, जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे, भाजपाचे ज्येष्ठ नेते वासुदेव काळे, अण्णा जगताप, तालक्यातील दुकानदार उपस्थित होते.

काही नागरिकांनी निश्चित माहितीच्या अधिकाराचा फायदा समाजाच्या हितासाठी केलेला आहे. परंतु, माहितीच्या अधिकारातून जे कार्यकर्ते ब्लॅकमेल करतात त्यामुळे चांगले कार्यकर्ते बदनाम होत चालले आहेत. परिणामी, माहितीच्या अधिकारात मागवलेली माहिती कोणत्या कामासाठी मागवली, यावर शासनाने कडी नजर ठेवली पाहिजे. दरम्यान, रेशन दुकानदारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे कुल म्हणाले.

Web Title: Misuse of information authority - Rahul Kul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे