राज्यातील अनेक शहरात कमाल तापमान पोहचले चाळीशी पार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 09:13 PM2021-03-27T21:13:18+5:302021-03-27T21:13:30+5:30

राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक कमाल तापमान ४१.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे .

Maximum temperatures reached over forty in many cities in the state | राज्यातील अनेक शहरात कमाल तापमान पोहचले चाळीशी पार

राज्यातील अनेक शहरात कमाल तापमान पोहचले चाळीशी पार

googlenewsNext

पुणे : राज्यात अवकाळी पावसाचे सावट दूर झाल्यानंतर हवामान कोरडे झाल्याने तापमानात मोठी वाढ झाली असून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणचे कमाल तापमानाने चाळीशी पार केली आहे.

राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक कमाल तापमान ४१.२ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. सांताक्रुझ येथील कमाल तापमानही ४०.९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते सरासरीच्या तुलनेत ७.७ अंश सेल्सिअसने अधिक आहे. 

कोकण, गोव्याच्या तुरळक भागात उष्णतेची तीव्र लाट होती. काही भागात कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली आहे. कोकणातील काही भागात तर मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. 
पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असून कमाल व किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. 

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल व किमान तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३८.१/१७.३, लोहगाव ३८.८/१९.८, जळगाव ४०.४/१५, कोल्हापूर ३८.२/२३.७, महाबळेश्वर ३२.१/१९, मालेगाव ३९.८/१७.४, नाशिक ३८.२/१६, सातारा ३८/२०.४, सोलापूर ४०.४/२२.६, मुंबई ३८/२५, सांताक्रुझ ४०.९/२२.२, रत्नागिरी ३६/२४.४, पणजी ३५/२७.२, डहाणु ३४.५/ २३.१, औरंगाबाद ३८.२/१९, परभणी ३९.५/२०.४, अकोला ४०.४/१७.५, बुलढाणा ३७.८/२०, चंद्रपूर ४१.२/२१, गोंदिया ३७.६/१९.२, नागपूर ३९/१८.३, वर्धा ३९.४/१९.९.

Web Title: Maximum temperatures reached over forty in many cities in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.