कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळातील पवना धरण 100 टक्के फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 08:09 PM2017-08-20T20:09:31+5:302017-08-20T21:18:51+5:30

लोणावळा, दि. 20 - मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवन मावळातील पवना धरण 100 टक्के भरले आहे. संततधार पावसामुळे धरणाची ...

Maval Pawana dam 100 percent full | कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळातील पवना धरण 100 टक्के फुल्ल

कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळातील पवना धरण 100 टक्के फुल्ल

googlenewsNext

लोणावळा, दि. 20 - मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवन मावळातील पवना धरण 100 टक्के भरले आहे.
संततधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने धरणाचे सर्व सहा दरवाजे अर्धा फुटाने उघडत 3680 क्यसेक्सने पाण्याचा विसर्ग पवना नदीत सोडण्यात आला आहे.

आज दुपारी एक वाजता धरणाचे चार दरवाजे अर्धा फुटाने उघडत त्याद्वारे 1472 क्युसेक्स व हायड्रो गेटद्वारे 1428 क्यसेक्स पाणी धरणातून सोडण्यात आले होते मात्र पावसाचा जोर वाढतच राहिल्याने दुपारी 3.30 नंतर यामध्ये वाढ करत सहा दरवाज्यांवाटे 2208 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी दिली. लोणावळा व मावळ परिसरात मागील दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू असल्याने धरणांची पाणी पातळी वाढली आहे. पवना धरण हे शंभर टक्के भरले असून धरणात 8.512 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाची संततधार व जोर आजही कायम असल्याने धरणातून दरवाजे व हायड्रो गेटमधून 3680 क्युसेक्सने पाणी विसर्जित करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे.

पावसामुळे पवना नदी दुथडी भरुन वाहत असताना तीच्यामध्ये धरणातून ऐवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने नदीला पूर येण्याची शक्यता ध्यानात घेत नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

{{{{dailymotion_video_id####x845a4b}}}}

Web Title: Maval Pawana dam 100 percent full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.