'AIIMS, शिवनेरी संग्रहालय, जागतिक दर्जाचा स्कायवॉक...'; अंतरिम अर्थसंकल्पात पुण्याला काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 03:42 PM2024-02-27T15:42:06+5:302024-02-27T15:47:21+5:30

या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे...

Maharashtra Budget: 'AIIMS, Shivneri Museum, World Class Skywalk...'; What about the interim budget for Pune? | 'AIIMS, शिवनेरी संग्रहालय, जागतिक दर्जाचा स्कायवॉक...'; अंतरिम अर्थसंकल्पात पुण्याला काय?

'AIIMS, शिवनेरी संग्रहालय, जागतिक दर्जाचा स्कायवॉक...'; अंतरिम अर्थसंकल्पात पुण्याला काय?

पुणेराज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चासाठी 6 लाख 522 कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये 4 लाख 98 हजार 758 कोटी रुपये महसुली जमा आणि 5 लाख 8 हजार 492 कोटी रुपये महसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट 9 हजार 734 कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट 99 हजार 288 कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.

अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास 9 हजार 193 कोटी रुपये, रोजगार हमी योजनेसाठी 2 हजार 205 कोटी रुपये, मराठी विभागासाठी 71 कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 18 हजार 165 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची वार्षिक योजना 1 लाख 92 हजार कोटी रुपयांची आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 15 हजार 893 कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजनेसाठी 15 हजार 360 कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.

या अर्थसंकल्पात पुणे जिल्ह्याच्या दृष्टीने केलेल्या महत्त्वाच्या तरतुदी पुढीलप्रमाणे-

  1. मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय उभारण्यात येणार आहे.
  2. पुणे चक्राकार वळण मार्गाकरिता भूसंपादनासाठी 10 हजार 519 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
  3. कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु.
  4. जळगाव, लातूर, बारामती, नंदूरबार, गोंदिया, कोल्हापूर आणि मिरज जिल्हा सांगली  येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय उभारण्यात येणार.
  5. नागपूर एम्सच्या धर्तीवर औंध, पुणे येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था उभारण्यात येणार.
  6. लोणावळ्यात जागतिक दर्जाचा स्कायवॉक प्रकल्प उभारला जाणार आहे. यासाठी 333 कोटी 56 लाख गुंतवण्यात येणार.
  7. स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर, ता. हवेली व समाधी स्थळ वढू बुद्रुक तालुका शिरुर, जिल्हा पुणे येथील स्मारकासाठी 270 कोटी रुपये किमतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचे कामही सुरू करण्यात आले आहे.
  8. एकविरादेवी मंदिर जिल्हा पुणे तिर्थक्षेत्र विकास प्राधिकरणांची स्थापना करण्यात येणार.
  9. पुणे शहरातील संगमवाडी येथे लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभारण्यात येणार.

Web Title: Maharashtra Budget: 'AIIMS, Shivneri Museum, World Class Skywalk...'; What about the interim budget for Pune?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.