माळीणकरांची उभारी समाजाला प्रेरणा देणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 04:41 AM2017-07-31T04:41:47+5:302017-07-31T04:41:47+5:30

माळीणकरांच्या भावना दु:खी असल्या, तरी ते सावरून धैर्याने उभे राहत आहेत, त्यांची उभारी समाजाला प्रेरणा देणारी आहे. आज तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आदर्श माळीण उभे करण्याचा संकल्प करू

maalainakaraancai-ubhaarai-samaajaalaa-paraeranaa-daenaarai | माळीणकरांची उभारी समाजाला प्रेरणा देणारी

माळीणकरांची उभारी समाजाला प्रेरणा देणारी

googlenewsNext

घोडेगाव : माळीणकरांच्या भावना दु:खी असल्या, तरी ते सावरून धैर्याने उभे राहत आहेत, त्यांची उभारी समाजाला प्रेरणा देणारी आहे. आज तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आदर्श माळीण उभे करण्याचा संकल्प करू, असे आवाहन जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी केले.
माळीण दुर्घटनेचा तृतीय पुण्यस्मरण दिन दुर्घटनाग्रस्त ठिकाणी वाचलेल्या शाळेच्या आवारात घेण्यात आला. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ, परिसरातील लोक उपस्थित होते. दुर्घटनेच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या स्मृतिस्तंभावर मान्यवरांनी पुष्पचक्र वाहून मृत आत्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर शाळेच्या आवारात श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम झाला. या वेळी तहसीलदार रवींद्र सबनिस, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपअभियंता एल. टी. डाके, पंचायत समिती सभापती उषाताई कानडे, उपसभापती नंदा सोनावले, माजी समाजकल्याण सभापती सुभाष मोरमारे, जिल्हा परिषद सदस्या रूपा जगदाळे, पंचायत समिती सदस्य संजय गवारी, आशाताई शेंगाळे, इंदुबाई लोहकरे, बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन मधुअप्पा बोºहाडे इत्यादी उपस्थित होते.
या वेळी ग्रामस्थांच्या वतीने मच्छिंद्र झांजरे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात काही ग्रामस्थांनी आपली मनोगते व्यक्त केली. यामध्ये सावळेराम लेंभे, कैलास झांजरे, तुकाराम लेंभे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत नवीन गावाबद्दल तक्रारी करीत काही मागण्या केल्या.

Web Title: maalainakaraancai-ubhaarai-samaajaalaa-paraeranaa-daenaarai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.