सरकारला दूध आंदोलनातून धडा- राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 03:51 AM2018-07-22T03:51:02+5:302018-07-22T03:51:30+5:30

पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन विष्णू हिंगे यांच्या हस्ते खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार

Lessons from the movement of milk: Raju Shetty | सरकारला दूध आंदोलनातून धडा- राजू शेट्टी

सरकारला दूध आंदोलनातून धडा- राजू शेट्टी

Next

धनकवडी : सरकार ऐकत नसेल तर शेतक-यांनी दूध संघाच्या बरोबरीने एकत्र येऊन सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध आंदोलन केल्यास यश मिळते आणि त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दूध आंदोलनाचा यशस्वी लढा होय, असे खासदार राजू शेट्टी म्हणाले. पुणे जिल्हा दूध उत्पादक संघाचे चेअरमन विष्णू हिंगे यांच्या हस्ते खासदार राजू शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेट्टी बोलत होते.
या वेळी संघाच्या व्हाईस चेअरमन वैशाली गोपाळघरे , ज्येष्ठ संचालक गोपाळराव म्हस्के, संदीप जगदाळे, कार्यकारी संचालक डॉ. विवेक क्षीरसागर, स्वाभिमानी संघटनेचे प्रवक्ते अ‍ॅड. योगेश पांडे, जिल्हा अध्यक्ष राज ढवाण पाटील, पांडुरंग काळे, पृथ्वीराज जाचक उपस्थित होते.
शेट्टी पुढे म्हणाले, शेतकºयांना गाईच्या दुधाला थेट पाच रुपये मिळावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची होती. गाईच्या दुधाला खरेदी दर सत्तावीस रुपये असताना हे दर चौदा रुपये ते एकोणीस रुपये पर्यंत खाली आल्याने शेतकºयांचे
प्रचंड आर्थिक नुकसान होत होते. म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १६ जुलैपासून संप पुकारून दूधकोंडी करण्याचा निर्णय घेतला. शहरी भागाची नाकाबंदी केल्याशिवाय सरकार ऐकणार नाहीत म्हणून आम्ही हा निर्णय घेतला व आमचा लढा यशस्वी झाला.
यामुळे शेतकºयांना पाच रुपये थेट देण्याचा निर्णय झाला व याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. सर्वांच्या सहभागामुळेच आंदोलन यशस्वी झाले असे शेट्टी म्हणाले.

राज्याबाहेरील दुधाची विक्री अनुदानामुळेच
चीन व अमेरिका यांच्यामध्ये व्यापारयुद्ध सुरू आहे. याचा फायदा घेऊन चीनमध्ये जास्त असलेले दूध व दुग्धजन्य पदार्थ निर्यात करण्याची संधी आहे. या दृष्टीने केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. महाराष्ट्रात बाहेरील राज्यांतून येणाºया दुधाची विक्री होत आहे.
कारण तेथील सरकार दुधाला पाच रुपये अनुदान देत आहे. म्हणून महाराष्ट्रात सदर दूध येत आहे. दुधाचे दीर्घकालीन धोरण ठरविण्यासाठी आतापासूनच प्रयत्न करणे गरजेचे असून शेतकºयांच्या बँक खात्यावर थेट रक्कम जमा करण्याचे धोरण ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी अवलंबावावे लागेल. दूध पावडरचे दर वाढल्यास सध्याची परिस्थिती निश्चितच बदलणारी असून दुधाच्या मार्केटिंगवर लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Lessons from the movement of milk: Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.