Pune: दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

By विवेक भुसे | Published: July 1, 2023 02:28 PM2023-07-01T14:28:37+5:302023-07-01T14:31:08+5:30

हवेत कोयता फिरवून आम्ही इथले भाई आहोत, असे ओरडून दहशत पसरविली...

koyta tried to kill himself by stabbing him after being hit by a bike pune crime news | Pune: दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Pune: दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारल्याने कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

googlenewsNext

पुणे : पेट्रोल पंपावर दुचाकीचा धक्का लागल्याने त्याचा जाब विचारला. त्यावरुन भाईगिरी करणार्या तिघांनी एकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला हवेत कोयता फिरवून आम्ही इथले भाई आहोत, असे ओरडून दहशत पसरविली.

याप्रकरणी पवन पवरचंद घागट (वय ४६, रा. बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गणेश विष्णु अडागळे (वय २०, रा. दापोडी) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार व एका अल्पवयीन मुलावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बोपोडीतील छाजेड पेट्रोल पंपावर शुक्रवारी दुपारी ४ वाजता घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, जावई व मुलगी हे भाजी आणण्यासाठी जात होते. छाजेड पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतेवेळी फिर्यादीचे मागून एका दुचाकीवर बसून तिघे जण आले. त्यांच्या गाडीचा धक्का फिर्यादीच्या गाडीला लागला. त्याचा फिर्यादी यांनी जाब विचारल्यावर आरोपींनी त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. आम्ही या एरियाचे भाई आहोत, तू ओळखत नाही काय, असे म्हणून त्यांच्यातील एकाने कमरेच्या शर्टखाली ठेवलेला कोयता काढून फिर्यादीवर वार करुन गंभीर जखमी केले. त्याने हवेत कोयता फिरवून तेथे उपस्थित लोकांना दमदाटी करीत दहशत पसरविली. पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ तपास करीत आहेत.

Web Title: koyta tried to kill himself by stabbing him after being hit by a bike pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.