वरिष्ठ अधिकाऱ्यानेच 'असे' विधान करणे चुकीचे; नवनियुक्त पोलिस आयुक्तांना अजित पवारांनी फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2020 08:37 PM2020-10-09T20:37:41+5:302020-10-09T20:43:22+5:30

नवनियुक्त पोलिस आयुक्तांना अजित पवारांनी फटकारले..  

It would be wrong for a senior police officer to say that unemployment has increased and crime has increased | वरिष्ठ अधिकाऱ्यानेच 'असे' विधान करणे चुकीचे; नवनियुक्त पोलिस आयुक्तांना अजित पवारांनी फटकारले

वरिष्ठ अधिकाऱ्यानेच 'असे' विधान करणे चुकीचे; नवनियुक्त पोलिस आयुक्तांना अजित पवारांनी फटकारले

Next
ठळक मुद्देमास्कचा वापर न करणार्‍या व्यक्तींच्या कारवाईचा आढावा

पुणे : कोरोनामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यातूनच गुन्हेगारीच्या घटना वाढत आहे अशा प्रकारचे विधान एखाद्या कायदा सुव्यवस्था राखणार्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच करणे चुकीचे असल्याची भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली. 

पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दोन दिवसांपूर्वीच शहरात वाढलेल्या गुन्ह्यांमागे लॉकडाऊनमुळे आलेली बेरोजगारी तसेच कारागृहातून पॅरोलवर सुटलेले गुन्हेगार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे मत व्यक्त केले होते. याबाबत पवार यांनी कायदा सुव्यवस्था राखणार्‍या वरिष्ठ अधिकाऱ्यानेच अशा प्रकारचे विधान करणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. 

दरम्यान, पुणे शहरात खुन आणि इतर गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे का ? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले , पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोना परिस्थितीवर प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. या कामात प्रशासन, डॉक्टर, पोलीस चांगल्या प्रकारे काम करीत आहे. यामध्ये पत्रकार कोरोनाबाबत प्रत्येक वेळी नागरिकांमध्ये प्रबोधन करत आहे. ही कौतुकाची बाब आहे. पण मी आज शहरात काही ठिकाणी पाहिले. तर अद्याप ही नागरिक मास्क वापरत नाही. हे पाहून चिंता वाटत असून पोलीस विभागामार्फत मास्कचा वापर न करणार्‍या व्यक्तीच्या कारवाईचा आढावा आज घेतला. त्यामध्ये जिल्ह्यात तब्बल ११ कोटी रुपये जमा झाले यावरून परिस्थिती लक्षात येते. 

Web Title: It would be wrong for a senior police officer to say that unemployment has increased and crime has increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.