विद्यार्थी पोहचविणार शासकीय योजनांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 08:23 PM2018-07-28T20:23:20+5:302018-07-28T20:26:48+5:30

माहिती व जनसंपर्क महासंचालनयाकडून उच्च शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना किमान १ कोटी नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे.

Information about Government Schemes will be given by students | विद्यार्थी पोहचविणार शासकीय योजनांची माहिती

विद्यार्थी पोहचविणार शासकीय योजनांची माहिती

Next
ठळक मुद्देयुवा माहिती दूत उपक्रमयुवा माहिती दूत उपक्रमाचे स्वरुप, कार्यपद्धती व आवश्यकता स्पष्ट करणाऱ्या माहितीचा मसुदा प्रसिद्धसहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रमाणपत्र दिले जाणार

पुणे : राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती थेट लाभार्थी तसेच नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी करणार आहेत. त्यासाठी येत्या १ आॅगस्ट पासून ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे.  
माहिती व जनसंपर्क महासंचालनयाकडून उच्च शिक्षण विभागाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध योजना किमान १ कोटी नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त महाविद्यालये व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न करावेत,अशा सूचना उच्च शिक्षण विभागाने सर्व विद्यापीठ व महाविद्यालयांना दिल्या आहेत.
युवा माहिती दूत उपक्रमाचे स्वरुप, कार्यपद्धती व आवश्यकता स्पष्ट करणाऱ्या माहितीचा मसुदा उच्च शिक्षण विभागाने प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार महाविद्यालयांनी कार्यवाही करावे. या कार्यवाहीचा अहवाल सात दिवसांत पुणे विभागीय उच्च शिक्षण विभागाकडे सादर करावेत असे सहसंचालक विजय नारखेडे यांनी स्पष्ट केले आहे.  
राज्यात ६ हजारांपेक्षा जास्त महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयात सुमारे २३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत. त्यापैकी किमान ५ ते ६ टक्के विद्यार्थी यामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. ज्या विद्यार्थ्यांना समाजकार्याची आवड आहे, त्यांचा प्राधान्याने यामध्ये समावेश करण्यात यावा अशी सुचना परिपत्रकामध्ये करण्यात आले आहे.  
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. याद्वारे विद्यार्थी सर्व माहिती लाभार्थी व नागरिकांना समजावून सांगतील. युवा माहिती दूत पुढील ६ महिने कार्यरत राहणार आहेत. यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनाकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांबरोबर महाविद्यालयाने युवा माहिती दूत मार्गदर्शक म्हणून एका प्राध्यापकांची नियुक्ती करावी अशी सुचना करण्यात आली आहे. 

Web Title: Information about Government Schemes will be given by students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.