पुणे रेल्वे विभागात एका महिन्यात फुकट्यांकडून तब्बल एक कोटी ३८ लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 10:29 AM2023-01-02T10:29:31+5:302023-01-02T10:31:08+5:30

डिसेंबर महिन्यात तिकीट तपासणीदरम्यान १८ हजार २३४ लोक विनातिकीट प्रवास करताना आढळून आले....

In the month of December, the Pune Railway Department collected a fine of 1 crore 38 lakhs | पुणे रेल्वे विभागात एका महिन्यात फुकट्यांकडून तब्बल एक कोटी ३८ लाखांचा दंड वसूल

पुणे रेल्वे विभागात एका महिन्यात फुकट्यांकडून तब्बल एक कोटी ३८ लाखांचा दंड वसूल

Next

पुणे :पुणेरेल्वे विभागात डिसेंबर महिन्यात तिकीट तपासणीदरम्यान १८ हजार २३४ लोक विनातिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून एक कोटी ३८ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला. तसेच पाच हजार ४३४ जणांना अनियमित प्रवासासाठी ३१ लाख ४१ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सामान बुक न करता तसेच घेऊन जाणाऱ्या २६६ जणांकडून ३१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यात दाेन लाख ५६ हजार ४२ केसेसमध्ये १८ कोटी ३४ लाख रुपये दंड स्वरूपात वसूल करण्यात आले.

ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापकांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे आणि विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्या समन्वयाने तिकीट निरीक्षकांद्वारे करण्यात आली.

Web Title: In the month of December, the Pune Railway Department collected a fine of 1 crore 38 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.