शेकडो पोती कांदा फेकला जातो, तर शेकडो एकर पेरलाही जातोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 01:24 AM2019-02-02T01:24:29+5:302019-02-02T01:24:53+5:30

कांद्याचा वांदा; कमी कालावधीत भरपूर केली होती लागवड

Hundreds of grams of onion are thrown and hundreds of acres are being sown | शेकडो पोती कांदा फेकला जातो, तर शेकडो एकर पेरलाही जातोय

शेकडो पोती कांदा फेकला जातो, तर शेकडो एकर पेरलाही जातोय

googlenewsNext

खोडद : यंदा दुष्काळाचा दाहकतेत टिकून राहणारे पीक म्हणून आणि कमी कालावधीत येणारे नगदी पीक म्हणून जुन्नर तालुक्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर दुसरीकडे, मागील हंगामातील कांदाच अद्याप मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. मात्र, त्या कांद्याना साठवून ठेवल्याने मोड आल्यामुळे शेकडो पोती कांदा अक्षरश: फेकून द्यावा लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांची मेहनत, पैसा वाया गेला असून येणाºया कांद्याला तरी किमान भाव मिळेल की नाही, याची चिंता शेतकºयांना सतावत आहे.

मागील वर्षभर कांद्याला चांगला बाजारभाव नसल्याने साठवणूक चाळींमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. यंदा तरी कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, या आशेने शेतकºयांनी कांद्याची विक्रीदेखील केली नव्हती. मात्र, सध्याच्या विषम हवामानातमुळे त्या साठविलेल्या कांद्याला मोड फुटत असल्याने अनेक शेतकºयांनी हा कांदा अक्षरश: फेकून दिला आहे. मोड आलेला कांदा ना व्यापारी घ्यायला तयार आहेत, ना चाळीत व्यापारी साठवून ठेवायला तयार आहेत. त्यामुळे शेतकºयांना पर्यायच राहिलेला नाही.
मिागील वर्षी कांद्याला बाजारभाव मिळाला नसतानाही चालू कांद्याची लागवड केली आहे.

भाजीपाला आणि फळपिकांवर सध्याच्या विषम हवामानामुळे विपरित परिणाम होत आहे. पिकांची वाढ खुंटली, तर मावा किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. विषम हवामान आणि तापमान यामुळे पिकांच्या मुळांची वाढ मंदावली आहे. सध्याच्या वातावरणामुळे शेतकºयांना बुरशीनाशकांची वारंवार फवारणी करावी लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

थंडीमुळे पात वाढते व गाठ कमी होते
चालू वर्षी कडाक्याच्या थंडीने महाराष्ट्र गाराठला असून, या थंडीचा तसेच विषम हवामानाचा परिणाम शेतपिकांवरही मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. सध्या रब्बी पिकांना ही थंडी पोषक ठरत असून, गहू, हरभरा, कांदा या पिकांची जोरदार वाढ होत आहे. विशेषत: कांदापिकाच्या बाबतीत शाखीय वाढ (कांदापात) जास्त होऊन कांदागाठीची वाढ कमी होत आहे. यामुळे दर्जात्मकदृष्ट्या हा कांदा कमी टिकाऊ असेल.

नवीन लागवड केलेल्या भाजीपाला पिकांमध्ये रस शोषणाºया किडींच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करावी. सकाळी शेताच्या बांधावर धूर करून तापमान वाढविण्याचा प्रयत्न करावा. फळबागांमध्ये या तंत्राचा चांगला लाभ होतो. सध्या मावा या प्रमुख किडीचा तसेच डावणी आणि भुरीसारख्या रोगांचा द्राक्षपिकावरही परिणाम होऊ शकतो. काढणीला आलेल्या बागांमध्ये मणी तडकणे, साखर उतारा कमी मिळणे अशा अडचणी उद्भवू शकतात. डाळिंबबागांवरही मावा व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. त्याचेही नियंत्रण करणे गरजेचे आहे.
- प्रा. राधाकृष्ण गायकवाड
प्राचार्य, कृषी तंत्रनिकेतन, नारायणगाव
 

Web Title: Hundreds of grams of onion are thrown and hundreds of acres are being sown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.