पुण्यात गुंडागर्दी! तलवारीने एकावर वार; दुकाने फोडली, हल्लेखोर दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:47 AM2023-12-06T09:47:00+5:302023-12-06T09:47:35+5:30

याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे....

Hooliganism in Pune! strike one with a sword; Shops were broken, two assailants arrested | पुण्यात गुंडागर्दी! तलवारीने एकावर वार; दुकाने फोडली, हल्लेखोर दोघांना अटक

पुण्यात गुंडागर्दी! तलवारीने एकावर वार; दुकाने फोडली, हल्लेखोर दोघांना अटक

पुणे : तलवारी उगारून गुंडांनी तीन दुकानांची तोडफोड करण्याबरोबरच एकावर तलवारीने वार केल्याचा प्रकार गोखलेनगर भागातील जनवाडी परिसरात घडला. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

योगेश अनंता गायकवाड आणि मयूर मोरे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुहास सुरेश माने (वय ३०, रा. शांतीनगर सोसायटी, सकाळनगर) याने फिर्याद दिली आहे. गायकवाड आणि मोरे सराईत आहेत. आरोपींचे एकाशी भांडण झाले होते. त्या रागातून त्यांनी तलवारी उगारून परिसरात दहशत पसरविली.

राजकमल स्वीट मार्ट, अक्की मेन्स पार्लर आणि न्यू तृप्ती चिकन सेंटर या दुकानांची तोडफोड केली. दुकानांची तोडफोड करण्यात येत असल्याचे पाहून माने याने दुचाकी थांबविली. आरोपींनी माने याच्या खांद्यावर तलवारीने वार केले. दुकानदारांना धमकावून दुकाने बंद करण्यास सांगितले.

Web Title: Hooliganism in Pune! strike one with a sword; Shops were broken, two assailants arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.