हर हर महादेव! बारा वर्षांच्या मावळ्याने चोवीस तासांत केले १४ गड पादाक्रांत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 10:04 AM2023-04-19T10:04:13+5:302023-04-19T10:36:47+5:30

शिवविनायक दारवटकर या मुलाने आपला बारावा जन्मदिवस २४ तासांत १४ गडांची भ्रमंती करून साजरा केला

Har Har Mahadev! Fourteen-year-old Mawla made 14 forts on foot in twenty-four hours | हर हर महादेव! बारा वर्षांच्या मावळ्याने चोवीस तासांत केले १४ गड पादाक्रांत

हर हर महादेव! बारा वर्षांच्या मावळ्याने चोवीस तासांत केले १४ गड पादाक्रांत

googlenewsNext

शिवणे : कोंढवे-धावडे, खडकमाळ येथील शिवविनायक दारवटकर या मुलाने आपला बारावा जन्मदिवस २४ तासांत १४ गडांची भ्रमंती करून साजरा केला. शनिवारी (ता.१५) रात्री बारा वाजता सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वारूगडपासून सुरुवात करत महिमानगड, संतोषगड, वर्धनगड, भूषणगड, सदाशिवगड, वसंतगड, अजिंक्यतारा, सज्जनगड, कल्याणगड, चंदनगड, वंदनगड, शिरवळचा सुभान मंगळ व शेवटी रात्री बारा वाजता सिंहगड असे एकूण चौदा गड पादाक्रांत केले. त्याचबरोबर आपले दुर्ग भ्रमंतीचे अर्धशतकसुद्धा पूर्ण केले.

गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे, निसर्गाचे जतन व आरोग्याचे महत्त्व असा संदेश देत नितीन भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली व नाना शेलार, पवन शिंदे व ज्योती फालगे यांच्या सहकार्याने हे किल्ले सर केल्याचे यावेळी शिवचे वडील विनायक दारवटकर यांनी सांगितले.

यापूर्वीही केले अनेक ट्रेक

आपल्या जन्मदिनानिमित्त एका दिवसात एवढे गड सर करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी. त्याचबरोबर शिव दारवटकर याने आजपर्यंत सह्याद्रीमध्ये अवघड समजले जाणारे लिंगाणा, मोरोशीचा भैरवगड, कलावंतीण दुर्ग, तैल- बैल वॉल, यावर यशस्वी चढाई केली आहे. तोरणा-राजगड- सिंहगड (टीआरएस,) तोरणा - राजगड, खांडस -भीमाशंकर, पाबे ते सिंहगड (पीटूएस), कात्रज ते सिंहगड (केटूएस, रायगड प्रदक्षिणा, लगातार तीन वेळा सिंहगड व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लगातार चार वेळा राजगड सर केले आहे.

Web Title: Har Har Mahadev! Fourteen-year-old Mawla made 14 forts on foot in twenty-four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.