Pune Metro: मेट्रोचे काम करताना सापडले हॅन्ड ग्रेनेड; पुण्यातील बाणेर परिसरात खळबळ

By विवेक भुसे | Published: December 4, 2023 02:54 PM2023-12-04T14:54:15+5:302023-12-04T15:12:01+5:30

बाँम्ब जिवंत आहे का नाही, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी यंत्राचा वापर केला

Hand grenades found while working on Metro Excitement in Baner area of Pune | Pune Metro: मेट्रोचे काम करताना सापडले हॅन्ड ग्रेनेड; पुण्यातील बाणेर परिसरात खळबळ

Pune Metro: मेट्रोचे काम करताना सापडले हॅन्ड ग्रेनेड; पुण्यातील बाणेर परिसरात खळबळ

पुणे: शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेचे काम सुरू असताना बाणेर परिसरात खोदकामात जुने हातबाँम्ब सापडल्याची घटना उघडकीस आली. हिंजवडी मेट्रो मार्गिकेवर खांब उभे करण्याचे काम सुरु आहे. बाणेर परिसरातील आयशरच्या बाहेर खोदकाम सुरू असताना सोमवारी (४ डिसेंबर) दुपारी बाराच्या सुमारास जुने हातबाँम्ब (हँड ग्रेनेड) सापडले. 

मेट्रो कामगारांनी अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर चतु:शृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी त्वरित बाँम्ब शोधक नाशक पथकाला (बीडीडीएस) कळवले. पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून या रोडवरील वाहतूक थांबवून ठेवली होती. बाँम्ब जिवंत आहे का नाही, याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी यंत्राचा वापर केला. बाँम्ब शोधक नाशक पथकातील अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीने बाँम्ब सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे. यापूर्वी यापरिसरातील एका नाल्यात जुनी काही शस्त्रे सापडली होती.

Web Title: Hand grenades found while working on Metro Excitement in Baner area of Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.