HSC/12th Exam: राज्यातून पंधरा लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा 

By प्रशांत बिडवे | Published: February 20, 2024 12:17 PM2024-02-20T12:17:26+5:302024-02-20T12:50:34+5:30

राज्यातील १० हजार ४९७ कनिष्ठ महाविद्यालयांमधून १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून ८,२१,४५० विद्यार्थी व ६,९२,४२४ विद्यार्थीनीचा समावेश

Fifteen lakh students from the state will give the 12th examination | HSC/12th Exam: राज्यातून पंधरा लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा 

HSC/12th Exam: राज्यातून पंधरा लाख विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा 

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी राज्यातील १० हजार ४९७ कनिष्ठ महाविद्यालयांमधून १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये ८,२१,४५० विद्यार्थी व ६,९२,४२४ विद्यार्थीनीचा समावेश आहे. राज्यातील ३ हजार ३२० मुख्य केंद्रांवर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.

बारावीच्या परीक्षेचे दि.२१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत आयोजन केले आहे. राज्य मंडळाच्या  पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात येणार आहेत.  

विज्ञान शाखेचे साडेसात लाख विद्यार्थी देणार परीक्षा
  
विज्ञान शाखा ७ लाख ६० ४६, कला शाखा- ३ लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य शाखा- ३ लाख २९ हजार ९०५, किमान कौशल्यवर आधारित अभ्यासक्रम  (व्होकेशनल) - ३७ हजार २२६ आणि टेक्निकल सायन्स (आयटीआय) - ४ हजार ७५० विदयार्थ्यांचा समावेश आहे अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव अनुराधा ओक  यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

Read in English

Web Title: Fifteen lakh students from the state will give the 12th examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.