मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 05:09 PM2024-05-10T17:09:36+5:302024-05-10T17:09:54+5:30

अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना सुप्रीम कोर्टाने काही अटी ठेवल्या आहेत.

Arvind Kejriwal Interim Bail: Can't go to Chief Minister's office, and.., CM Kejriwal got bail on 'these' conditions | मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन

मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन

Arvind Kejriwal News: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानेशुक्रवारी केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरीम जामीन मंजूर केला आहे. पण, त्यांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे. हा जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांच्यापुढे काही अटी ठेवल्या आहेत.

केजरीवालांसमोर कोणत्या अटी?

  • अरविंद केजरीवालांना 50  रुपयांचा बाँड आणि तेवढीच रक्कम तुरुंग अधीक्षकांकडे जमा करावी लागेल.
  • जामीन काळात केजरीवालांना त्यांच्यावरील प्रकरणाबाबत कोणतेही भाष्य करता येणार नाही.
  • या प्रकरणातील कोणत्याही साक्षीदाराला भेटू किंवा बोलू शकणार नाहीत.
  • त्यांना मुख्यमंत्री कार्यालय किंवा दिल्ली सचिवालयात जाता येणार नाहीत. 
  • नायब राज्यपालांची परवानगी मिळाल्यानंतरच अधिकृत फाइल्सवर स्वाक्षरी करतील.
  • या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अधिकृत फाईल पाहता येणार नाहीत.
  • केजरीवालांना 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागेल. 

केजरीवाल यांना कधी अटक झाली?
दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. यापूर्वी ईडीने त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी 9 समन्स बजावले होते. मात्र, केजरीवाल कोणत्याही समन्सवर हजर झाले नाहीत. ते या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि मद्य व्यापाऱ्यांकडून लाच मागण्यात त्यांचा थेट सहभाग होता, असा केंद्रीय तपास यंत्रणेचा आरोप आहे.

Web Title: Arvind Kejriwal Interim Bail: Can't go to Chief Minister's office, and.., CM Kejriwal got bail on 'these' conditions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.