Pune | वर्चस्वाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; पांडव नगरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 09:51 PM2023-04-18T21:51:30+5:302023-04-18T21:52:15+5:30

पार्क केलेल्या ४ माेटारी, १४ दुचाकी आणि एका तीनचाकीची तोडफोड केली....

Fatal attack on youth over dominance dispute; Incidents in Pandava Nagar | Pune | वर्चस्वाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; पांडव नगरमधील घटना

Pune | वर्चस्वाच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला; पांडव नगरमधील घटना

googlenewsNext

पुणे : दोन टोळ्यांमधील वर्चस्वातून पांडव नगरमधील पीएमसी कॉलनीत घुसून गुंडांच्या एका टोळीने धुडगूस घातला. तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तेथे पार्क केलेल्या ४ माेटारी, १४ दुचाकी आणि एका तीनचाकीची तोडफोड केली.

याप्रकरणी सोनू सुनील अवघडे (वय २५, रा. पीएमसी कॉलनी,पांडवनगर) यांनी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेत सोनू अवघडे हे गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी पोलिसांनी रुपेश विटकर आणि इस्माईल शेख यांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार चपत्या विटकर, लवकुश चव्हाण, सुरज जाधव, अक्षय जाधव, इसान पठाण, बबलू देवकुळे, चैतन्य पवार, चिम्या व इतर १८ ते २० जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजता पांडव नगरमध्ये घडला.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी रुपेश विटकर, चपत्या विटकर पांडव नगरमध्ये एका परिसरात राहतात. फिर्यादी राहत असलेल्या सोसायटीत आरोपी हातात लाकडी दांडके घेऊन आले. त्यांनी खाली पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी गाड्यांची तोडफोड केली. रुपेश विटकर याने फिर्यादीला "माझी गाडी कोणी फोडली,कोण भाई झाला आहे या भागात,अजय व विजय हे दोनच भाई आहेत. त्यांना खुन्नस देतोस काय." असे म्हणून चपत्याने फिर्यादीला दांडक्याने मारहाण केली.

रुपेश विटकर याने लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या डोक्यात वार केला. त्याने तो वार चुकविल्याने खांद्याला वार लागून तो जखमी झाला. आरोपींनी वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. तसेच आरडाओरडा करून दहशत निर्माण केली. पोलिस उपनिरीक्षक चाळके तपास करीत आहेत.

Web Title: Fatal attack on youth over dominance dispute; Incidents in Pandava Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.