Pune Crime: जॉब देण्याचे आमिष दाखवून महिलेला साडेतीन लाखांचा गंडा; कोरेगाव पार्कमधील घटना

By भाग्यश्री गिलडा | Published: May 20, 2023 05:32 PM2023-05-20T17:32:42+5:302023-05-20T17:33:41+5:30

याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Extortion of three and a half lakhs to a woman by luring a job; Incident in Koregaon Park | Pune Crime: जॉब देण्याचे आमिष दाखवून महिलेला साडेतीन लाखांचा गंडा; कोरेगाव पार्कमधील घटना

Pune Crime: जॉब देण्याचे आमिष दाखवून महिलेला साडेतीन लाखांचा गंडा; कोरेगाव पार्कमधील घटना

googlenewsNext

पुणे : जॉब देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला एकूण ३ लाख ६७ हजार ४५१ रुपयांना गंडा घातल्याची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाइल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोरेगाव पार्क परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने पोलिसांना दिलेलया फिर्यादीनुसार, महिलेला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून जॉब मिळवून देतो असा मेसेज आला. मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले असता एक वेबसाईट ओपन झाली. त्यांनतर रजिस्ट्रेशन फी, ब्रोकर फी अशी वेगवेगळी कारणे देत महिलेकडून एकूण ३ लाख ६७ हजार ४५१ रुपये उकळले. मात्र पैसे भरून सुद्धा जॉब दिला नाही म्हणून महिलेने पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कुठलाही प्रतिसाद न मिळण्याने महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

त्यांनतर महिलेने तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना झालेल्या प्रकरणाची फिर्याद दिली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विनायक वेताळ हे करत आहेत.

Web Title: Extortion of three and a half lakhs to a woman by luring a job; Incident in Koregaon Park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.