एल्गार परिषद प्रकरण : डॅमेज हार्डडिस्कबाबत पुणे पोलीस घेणार अमेरिकेच्या एफबीआयची मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 07:51 PM2019-12-26T19:51:55+5:302019-12-26T20:01:02+5:30

बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी १९ जणांवर संशय व्यक्त

Elgar Council Case: pune police take help in case of Damage hard disk | एल्गार परिषद प्रकरण : डॅमेज हार्डडिस्कबाबत पुणे पोलीस घेणार अमेरिकेच्या एफबीआयची मदत

एल्गार परिषद प्रकरण : डॅमेज हार्डडिस्कबाबत पुणे पोलीस घेणार अमेरिकेच्या एफबीआयची मदत

Next
ठळक मुद्देपुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ मध्ये झाली होती एल्गार परिषद पुणे पोलीस दलातील अधिकारी व फॉरेन्सिक तज्ज्ञ ही हार्ड डिस्क घेऊन लवकरच अमेरिकेला जाणारपोलिसांनी वरवरा राव यांच्या घरी छापा घालून केले साहित्य जप्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात होता, असा निष्कर्ष पुणे पोलिसांनी यापूर्वी ४ वेगवेगळ्या फॉरेन्सिक लॅबची घेतली मदत

पुणे : एल्गार परिषद प्रकरणात जप्त केलेली एक हार्ड डिस्क डॅमेज झाली आहे. त्यातील डाटा परत मिळविण्यासाठी पुणे पोलीस अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) ची मदत घेणार आहे़. यासंबंधीची माहिती पुणे पोलिसांनी न्यायालयाला दिली आहे़. पुणे पोलीस दलातील अधिकारी व फॉरेन्सिक तज्ज्ञ ही हार्ड डिस्क घेऊन लवकरच अमेरिकेला जाणार आहेत. 
एल्गार परिषदेतील आरोपी वरवरा राव यांच्या घरातून पुणे पोलिसांनी एक हार्ड डिस्क जप्त केली होती. ही हार्ड डिस्क ओपन होत नसल्यामुळे पुणे पोलिसांनी यापूर्वी ४ वेगवेगळ्या फॉरेन्सिक लॅबची मदत घेतली होती. परंतु, यातील माहिती मिळवण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे आता ही माहिती मिळवण्यासाठी अमेरिकेच्या एफबीआयची मदत घेण्याचे पोलिसांनी ठरविले आहे. 


पुण्यातील शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ मध्ये एल्गार परिषद झाली होती. त्यानंतर दुसºया दिवशी कोरेगाव भीमा येथे दंगल झाली होती. या परिषदेत भडकाऊ भाषणे झाल्यावरुन विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असताना बंदी असलेल्या माओवादी संघटनेकडून या परिषदेसाठी निधी पुरविल्याची माहिती समोर आली होती. त्यावरुन बंदी असलेल्या माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुणे पोलिसांनी १९ जणांवर संशय व्यक्त केला. देशभरातील त्यांच्या घरावर छापे घालून काही कागदपत्रे, हार्ड डिक्स, पेनड्राईव्ह असे साहित्य जप्त केले आहे. पोलिसांनी हैदराबाद येथील प्रसिद्ध कवी, लेखक वरवरा राव यांच्या घरी छापा घालून महत्वाचे साहित्य जप्त केले. त्यत त्यांना एक हार्ड डिस्क मिळाली होती. तसेच आणखी एक हार्ड डिस्क मिळाली होती. या डॅमेज हार्ड डिस्कवरील डेटा मिळविण्यात पुणे पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे त्यातील डेटा मिळविण्यासाठी आता एफबीआयची मदत ठेवण्याचे पुणे पोलिसांनी ठरविले असून त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पुणे पोलीस व फॅरेन्सिक तज्ज्ञ ही हार्ड डिस्क घेऊन लवकरच अमेरिकेला जाणार आहेत. 
------
डेटा मिळविण्यात अपयश 
बंदी माओवादी संघटनांशी संबंध असलेल्या अनेक संशयीत आरोपींनी आपल्या संगणकावर काही पत्रे लिहिली व नंतर ती डिलिट केली होती. त्यांना ती पत्रे डिलिट केल्यानंतर पुरावा आपण नष्ट केला असा समज झाला होता. पण, हार्ड डिस्कवर त्यावर केलेल्या सर्व कामाचा पुरावा उपलब्ध राहतो, याची माहिती नसल्याने पुणे पोलिसांना या संशयित आरोपींनी मजकुर डिलिट केला असला तरी अनेक बाबींचा खुलासा झाला होता. त्यातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात होता, असा निष्कर्ष काढला आहे. तसा आरोप या गुन्ह्यातील आरोपींवर केला आहे. मात्र, वरवरा राव यांच्याकडील डॅमेज हार्ड डिस्कवरील डेटा मिळविण्यात अपयश आले आहे.

Web Title: Elgar Council Case: pune police take help in case of Damage hard disk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.