पुण्यात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आठ हजार दिव्यांच्या लखलखाट

By श्रीकिशन काळे | Published: November 16, 2023 02:36 PM2023-11-16T14:36:56+5:302023-11-16T14:37:40+5:30

‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि हर हर महादेवच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला

Eight thousand lights flashed in front of shivaji maharaj equestrian statue in Pune | पुण्यात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आठ हजार दिव्यांच्या लखलखाट

पुण्यात शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर आठ हजार दिव्यांच्या लखलखाट

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यातील पहिल्या पुतळ्यासमोर आठ हजार दिव्यांचा लखलखाट करण्यात आला. त्यानंतर भव्यदिव्य अशा अश्वारूढ स्मारकासमोर दीपोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.  ‘जय भवानी, जय शिवाजी’ आणि हर हर महादेवच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला. 

श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस संस्था प्रांगण येथे आयोजित दीपोत्सवाचे उद्घाटन सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, इतिहास संशोधक भाई चिंचवडे, समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड,  वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरविंद माने, स्वराज्य घराण्यांच्या वंशजांच्या, समितीच्या महिला भगिनींच्या व व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले.

शिवजयंती १९ फेब्रुवारीला स्वराज्यघराण्यांची वज्रमूठ निर्माण करणाऱ्या ऐतिहासिक सार्वजनिक शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागाची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल सरनोबत पिलाजी गोळे, सरसेनापती प्रतापराव गुजर, सरदार वाघोजी तुपे, श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के, श्रीमंत महाराज छत्रसाल बुंदेला, शिवरत्न शिवा काशीद जीवा महाले, सरदार जीवाजी सुभानजी रणनवरे, सरदार मल्हारजी तुकोजी निगडे, शुरवीर एकोजी शिरोळे यांना श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप तसेच सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला.
 
दीपोत्सवाचे आयोजन सोहळ्याचे संकल्पक समितीचे रवींद्र कंक, सचिन पायगुडे, शंकर कडू, समीर जाधवराव, निलेश जेधे, गोपी पवार, प्रवीण गायकवाड, मोहन पासलकर, किरण शितोळे, महेंद्र भोईटे, किरण देसाई,  मयुरेश दळवी आदींनी परिश्रम केले. 

Web Title: Eight thousand lights flashed in front of shivaji maharaj equestrian statue in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.