Pune: नवले पुलाजवळ डंपरची ट्रॅव्हल्सला धडक; अपघातात सातजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 08:35 AM2024-02-16T08:35:25+5:302024-02-16T08:36:37+5:30

हा अपघात शुक्रवारी सकाळी सात वाजता घडला...

Dumper hits Travels near Navle Bridge; Seven people were injured in the accident | Pune: नवले पुलाजवळ डंपरची ट्रॅव्हल्सला धडक; अपघातात सातजण जखमी

Pune: नवले पुलाजवळ डंपरची ट्रॅव्हल्सला धडक; अपघातात सातजण जखमी

धायरी (पुणे) : मुंबई - बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ एका डंपरने ट्रॅव्हल्सला जोराची धडक दिली. या अपघातात डंपरचालकासह ट्रॅव्हल्समधील सात प्रवाशी जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी सकाळी सात वाजता घडला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, नवले पुलाजवळ व्हीआरएल ट्रॅव्हल्स कंपनीचे ऑफिस आहे. इथून सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स बाहेर पडत असताना मुंबईच्या दिशेकडून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक विभागाचे अंमलदार यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. ह्यात सात प्रवाशी जखमी झाले असून ह्या अपघातात ट्रॅव्हल्सचे तसेच डंपरचे प्रचंड नुकसान झाले आहे.

Web Title: Dumper hits Travels near Navle Bridge; Seven people were injured in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.