डीएसकेंच्या मुलीचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 10:02 PM2019-02-06T22:02:20+5:302019-02-06T22:02:47+5:30

सीईओ धनंजय पाचपोर यांचा जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला

DSK's girl's anticipatory bail was rejected | डीएसकेंच्या मुलीचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

डीएसकेंच्या मुलीचा अटकपूर्व जामीन फेटाळला 

Next

पुणे : गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणात डी. एस. कुलकर्णी यांची मुलगी अश्विनी संजय देशपांडे यांचा अटकपूर्व जामीन उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी फेटाळला. तर डी. एस. के यांच्याकडील उच्च पदस्थ अधिकारी धनंजय पाचपोर यांचाही नियमित जामीन उच्च न्यायालयाने फेटाळला, अशी माहिती विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली. त्यांनी उच्च न्यायालयात जामीनाला विरोध केला.


डी एस के फसवणूक प्रकरणामध्ये बुधवारी उच्च न्यायालयामध्ये डी एस के़ कंपनीचे सीईओ धनंजय पाचपोर यांच्याबाजुने ज्येष्ठ विधिज्ञ मनोज मोहिते व आडसुरे यांनी युक्तिवाद केला तर सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवाद केला. 

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एन सांभरे यांनी धनंजय पाचपोर याचा जामीन फेटाळला. महाराष्ट्रातील ठेवीदारांचे हितसंरक्षण कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त निलेश मोरे करीत आहेत.

Web Title: DSK's girl's anticipatory bail was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.