डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शरयू बनकर, अश्विनी साळुंखे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:27 PM2017-12-22T12:27:45+5:302017-12-22T12:30:43+5:30

सर परशुरामभाऊ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या वादसभेने आयोजित केलेल्या डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक करंडक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शरयू बनकर आणि अश्विनी साळुंखे यांनी पटकावला. 

Dr. P. G. Sahastrabuddhe state level oratory, won sharayu bankar & ashwini salunkhe | डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शरयू बनकर, अश्विनी साळुंखे विजयी

डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत शरयू बनकर, अश्विनी साळुंखे विजयी

Next
ठळक मुद्देसर परशुरामभाऊ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या वादसभेतर्फे स्पर्धेचे आयोजनमाधव वझे यांनी पु. ग. सहस्त्रबुध्दे यांचे विद्यार्थी असतानाच्या आठवणी केल्या ताज्या

पुणे : सर परशुरामभाऊ महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या वादसभेने आयोजित केलेल्या डॉ. पु. ग. सहस्त्रबुद्धे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक करंडक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या शरयू बनकर आणि अश्विनी साळुंखे यांनी पटकावला. 
पारितोषिक वितरण समारंभ नाट्यसमीक्षक माधव वझे यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप शेठ अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याचबरोबर, उपप्राचार्य डॉ. विनायक सोलापूरकर, वादसभाप्रमुख दिपक कर्वे उपस्थित होते.
माधव वझे यांनी पु. ग. सहस्त्रबुध्दे यांचे विद्यार्थी असतानाच्या आठवणी ताज्या केल्या. आचार्य अत्रेंसह काम करताना मिळालेले हजरजबाबीपणाचे किस्से, ‘श्यामची आई’ चित्रपटात काम करतानाच्या आठवणी सांगितल्या. वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभागी होताना स्वत: अभ्यास करुन स्वत:चे विचार स्वत:च्या शब्दात मांडावे, हा संदेशही दिला. 
वरिष्ठ गटात हर्षाली घुले, शरयू बनकर आणि अक्षय मोरे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. कनिष्ठ गटात प्रणाली धाटावकर, पुष्कराज धोका आणि ईश्वरी सोनावणे यांनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. रेणुका केणेकर हिने सूत्रसंचालन केले. सायली देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. 

Web Title: Dr. P. G. Sahastrabuddhe state level oratory, won sharayu bankar & ashwini salunkhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.