ठळक मुद्देजि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळेत पार पडला कार्यक्रमगटशिक्षणाधिकारी आंधळे यांची प्रमुख उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
डोमरूळ : तालुक्यातील दहीद बु. येथील जिल्हा परिषद मराठी  उच्च प्राथमिक शाळेत शुक्रवारी पंचायत समिती  गटशिक्षणाधिकारी आंधळे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्यामची  आई स्मृती शताब्दी वर्ष कार्यक्रम घेण्यात आला. 
अध्यक्षीय गटशिक्षणाधिकारी आंधळे यांनी साने गुरूजी यांच्या  जीवन कार्यावर प्रकाश टाकून मानव जातीच्या कल्याणासाठी  साने गुरूजींचे विचार किती प्रेरणादायी आहे, असे प्रतिपाद केले.  शाळा राबवीत असलेल्या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक  व्ही.एच.धंदर यांचे आणि गावकर्‍यांच्या शाळेसाठी योगदानाबद्दल  गावाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे संचालन एस.ए.टेकाळे यांनी  तर आभार o्रीमती जाधव यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक  नरवाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अशोक दोतोंडे, शिक्षणतज्ज्ञ  गणेश पवार, शिक्षक मोहन नायडू आदी उपस्थित होते. कार्यक्रम  यशस्वी करण्यासाठी  व्याळेकर, उषा थोरात, अश्‍विनी वाघमारे,  कावेरी जाधव यांनी परिo्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक  आणि गावकरी उपस्थित होते.