Video: ‘दो धागे श्रीराम के लिए', प्रभू श्रीरामांसाठी स्मृती इरानी यांनी विणले वस्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 07:08 PM2023-12-10T19:08:25+5:302023-12-10T19:09:43+5:30

२२ डिसेंबरपर्यंत पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना येऊन श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे आपल्या रामलल्लासाठी विणता येणार

Do Dhage Shriram Ke Liye clothes woven by Smriti Irani for Lord Shriram | Video: ‘दो धागे श्रीराम के लिए', प्रभू श्रीरामांसाठी स्मृती इरानी यांनी विणले वस्त्र

Video: ‘दो धागे श्रीराम के लिए', प्रभू श्रीरामांसाठी स्मृती इरानी यांनी विणले वस्त्र

पुणे : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरातील श्रीरामाच्या मूर्तीसाठी वस्त्र विणण्याचा ‘दो धागे श्रीराम के लिए' हा उपक्रम येत्या १० ते २२ डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र, अयोध्या आणि पुण्यातील हेरीटेज हँडविविंग रिवायवल चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाचा शुभारंभ रविवार दि १० डिसेंबर रोजी सायं ६.३० वाजता शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज मैदानावर पार पडला. 

यावेळी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी स्वतः प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीसाठी वस्त्र विणले. तसेच कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी महाराज, चंद्रकांत पाटील आणि नीलम गोऱ्हे यांनीसुद्धा प्रभू श्री रामांच्या मूर्तीसाठी वस्त्र विणले. उद्घाटनानंतर १० ते २२ डिसेंबर दरम्यान पुण्यातील फर्गसन रस्त्यावरील सौदामिनी हँडलूम या ठिकाणी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांना येऊन श्रद्धेचे व विश्वासाचे दोन धागे आपल्या रामलल्लासाठी विणता येणार आहे.  सदर उपक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी करणे आवश्यक नाही, याची कृपया नोंद घ्यावी. आयोजकांच्या वतीने याआधी उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र आता कोणत्याही प्रकारच्या नोंदणीची आवश्यकता नाही, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: Do Dhage Shriram Ke Liye clothes woven by Smriti Irani for Lord Shriram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.