Pune: स्वतःच्या जिल्ह्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांना दाखवले काळे झेंडे, सात जण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 05:12 PM2024-01-25T17:12:40+5:302024-01-25T17:13:46+5:30

आळेफाटा चौकात अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे....

Deputy Chief Minister Ajit Pawar was shown black flags in his own district, five arrested | Pune: स्वतःच्या जिल्ह्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांना दाखवले काळे झेंडे, सात जण ताब्यात

Pune: स्वतःच्या जिल्ह्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांना दाखवले काळे झेंडे, सात जण ताब्यात

- नितीन शेळके

आळेफाटा (पुणे) : आळेफाटा येथे चिल्हेवाडी बंदिस्त नलिकेद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा शुक्रवारी (दि.२५) दुपारी दुसऱ्या टप्प्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. दरम्यान भूमिपूजन उरकून आळेफाटा येथील एका खाजगी कार्यक्रमासाठी अजित पवार यांचा ताफा जात असताना यावेळी आळेफाटा चौकात अजित पवारांना मराठा आंदोलकांकडून काळे झेंडे दाखवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

यावेळी पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष माउली खंडागळे, शरद पवार गटाचे सुरज वाजगे यांसह इतर सुधीर घोलप, अनिल गावडे,योगेश तोडकर, राजेश भोर, चंद्रभान गायकवाड यांना ताब्यात घेतले आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे २६ तारखेला मराठा समाजासोबत मुंबईत पोहोचणार आहे. मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा समाज असणार आहे. आम्हाला फक्त आरक्षण मिळालं पाहिजे ते कुठंही दिलं तरी चालेल. मग लोणावळ्यात, नवी मुंबईत किंवा आझाद मैदानात दिलं तरी चालेल, असे मनोज जरांगे यांचे म्हणणे आहे.

मराठा आंदोलक अजित पवार यांना दाखवण्याची शक्यता यापूर्वीच वर्तवण्यात आली होती. त्यामुळे, सभेच्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात होता. मात्र आळेफाटा चौकात अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे अजित पवार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. पिंपळवंडी येथील कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

माजी आमदार शरद सोनवणे आळेफाटा पोलीस ठाण्यात -
पोलिसांनी उद्धव ठाकरे गटाचे तालुकाध्यक्ष माउली खंडागळे, शरद पवार गटाचे सुरज वाजगे यांसह इतर  यांना ताब्यात घेतल्यानंतर माझी आमदार शरद सोनवणे पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. त्यानंतर विघ्नहर साखर कारखाना चेअरमन सत्यशील शेरकर, मयूर पवार, संजय बोरचटे यांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याच्या परिसरात गर्दी केली होती.

Web Title: Deputy Chief Minister Ajit Pawar was shown black flags in his own district, five arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.