धनगर अारक्षणला विलंब ; राम शिंदेंची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 09:20 PM2018-05-13T21:20:58+5:302018-05-13T21:20:58+5:30

धनगर समाजाला एस. टी. संवर्गाचे आरक्षण मिळावे व सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, या प्रमुख्य मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. अशी कबुली राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पुण्यात दिली.

Delay of Dhanagar reservation; Ram Shindane confession | धनगर अारक्षणला विलंब ; राम शिंदेंची कबुली

धनगर अारक्षणला विलंब ; राम शिंदेंची कबुली

Next

पुणे: धनगर समाजाला एस. टी. संवर्गाचे आरक्षण मिळावे व सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, या प्रमुख्य मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. सत्तेत येण्यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न झाल्यामुळे धनगर समाज केंद्र व राज्य शासनावर नाराज आहे,अशी कबुली खुद्द राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिली. मात्र,लोकसभा निवडणूकीपूर्वी सर्व मागण्या मान्य होतील,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
    पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 293 व्या जयंती महोत्सव समितीच्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. धनगर समाजाच्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचा (बार्टी) अहवाल धनगर आरक्षणाच्या विरोधी येत होता. बार्टीचा अहवाल दोन वेळा विरोधी आल्यामुळे शासनाने टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस’च्या (टीआयएसएस) सर्वेक्षण समितीचीकडे अहवाल तयार करण्याची जबाबदारी दिली. या समितीचा अहवाल धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने येईल,अशी आमची अपेक्षा आहे. मात्र,हा अहवाल पूर्ण होण्यास विलंब होत आहे.
      शिंदे म्हणाले,पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र,अद्याप आरक्षण न मिळाल्याने धनगर समाज केंद्र व राज्य शासनावर नाराज आहे. परंतु,आरक्षणाला उशीर होत असला तरी निवडणूकांपूर्वी आरक्षण मिळेल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून आरक्षणाचा व विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव मिळावे याबाबत मागणी केली जाईल. एकदा मंत्रीमंडळ बैठकीत विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा विषय चर्चेसाठी आला होता. मात्र, त्यावर काही मतमतांतरे समोर आल्यामुळे उपसमिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीकडूनही अद्याप कोणताही निर्णय जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची भेट घेवून याबाबत पाठपुरावा केला जाईल,असेही शिंदे म्हणाले.

Web Title: Delay of Dhanagar reservation; Ram Shindane confession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.