अण्णा हजारेंविषयी समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर; आमदार जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस

By नम्रता फडणीस | Published: October 8, 2023 06:25 PM2023-10-08T18:25:35+5:302023-10-08T18:25:42+5:30

पुण्यातील कायदेशीर सल्लागार ॲड. मिलिंद पवार यांच्यामार्फत हजारे यांना कायदेशीर नोटीस बजावली

defamatory content on social media about Anna Hazare Legal notice to MLA Jitendra Awad | अण्णा हजारेंविषयी समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर; आमदार जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस

अण्णा हजारेंविषयी समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर; आमदार जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस

googlenewsNext

पुणे : समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

आव्हाड यांनी हजारे यांचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित केले. ‘या माणसाने देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कोणी गांधी होत नाही,’ असा मजकूर आव्हाड यांनी समाजमाध्यमात प्रसारित केला होता. हजारे यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी त्यांचे पुण्यातील कायदेशीर सल्लागार ॲड. मिलिंद पवार यांच्यामार्फत हजारे यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. 

सध्या राजकारणातील घडामोडींमुळे वातावरण गढूळ झाले आहे. हजारे यांचा काही संबंध नसताना त्यांच्याविषयक बदनामीकारक मजकूर आव्हाड यांनी प्रसारित केला आहे. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक बदनामी केली. त्यामुळे त्यांना कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली आहे. संबंधित नोटीशीची प्रत माहितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही पाठविण्यात आली आहे, असे ॲड. पवार यांनी सांगितले.

आव्हाड जबाबदार राजकीय नेते आहेत. त्यांनी मजकूर प्रसारित करुन हजारे यांनी बदनामी केली आहे. हजारे यांच्या नावाचा वापर करुन आव्हाड राजकीय प्रसिद्धी मिळवत आहेत. आव्हाड यांच्याविरुद्ध १० ते १५ फौजदारी खटले आहेत. आव्हाड बदनामीकारक मजकूर प्रसारित करुन समाजात वाद निर्माण करतात. बेजबाबदार राजकीय व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज वाटल्याने आव्हाड यांना नोटीस पाठविण्यात आली आहे, असे हजारे यांच्या वतीने ॲड. पवार यांनी दिलेल्या नोटिशीत नमूद केले आहे. या पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाब मलिक यांनी हजारे यांच्याविरुषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याने त्यांना नोटीस बजाविण्यात आली होती. तिवारी आणि मलिक यांनी माफी मागितली होती. आव्हाड यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध मानहानी, बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी आणि दिवाणी स्वरुपाचे दावे दाखल करण्यात येतील, असे ॲड. पवार यांनी सांगितले.

Web Title: defamatory content on social media about Anna Hazare Legal notice to MLA Jitendra Awad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.