Bazar Samiti Election: सभापती पदासाठी इच्छुकांची गर्दी; प्रमुखांची वाढली डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 03:26 PM2023-05-05T15:26:07+5:302023-05-05T15:26:22+5:30

राष्ट्रवादीतील बंडखोर आणि जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांच्यामुळे सर्वपक्षीय पॅनलचा विजय सुकर

Crowd of aspirants for Speaker's post; Increased headache of the head | Bazar Samiti Election: सभापती पदासाठी इच्छुकांची गर्दी; प्रमुखांची वाढली डोकेदुखी

Bazar Samiti Election: सभापती पदासाठी इच्छुकांची गर्दी; प्रमुखांची वाढली डोकेदुखी

googlenewsNext

दुर्गेश मोरे

पुणे : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपपुरस्कृत सर्वपक्षीय पॅनलने १८ पैकी १३ जागांवर विजय मिळवला आहे. तर आडते- व्यापारी आणि हमाल-तोलारी मतदारसंघातील विजयी उमेदवारांनीही सर्वपक्षीय पॅनललाच झुकते माप देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. दुसरीकडे सभापती पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. यामध्ये दिग्गजांचाही समावेश असल्याने भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढली.

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी सर्वपक्षीय पॅनलने राष्ट्रवादी पुरस्कृत आण्णासाहेब मगर सहकार पॅनलचा पुरता धुव्वा उडवला. राष्ट्रवादीच्या पॅनलला ग्रामपंचायत गटातून केवळ दोन जागांवर विजय मिळवता आला आहे. राष्ट्रवादीतील बंडखोर आणि जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांच्यामुळे सर्वपक्षीय पॅनलचा विजय सुकर झाला आहे. आता प्रश्न आहे तो सभापती निवडीचा. बाजार समितीच्या सभापती उपसभापतीची मंगळवारी निवड होणार आहे. यासाठी अनेक दिग्गजांनी फिल्डिंग लावली आहे. रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर, प्रकाश जगताप, दिलीप काळभोर, राजाराम कांचन, रवींद्र कंद, मनीषा हरपळे आदींचा यात समावेश आहे. त्यामुळे निवडायचे कोणाला असा पेच सध्या निर्माण झाला आहे.

दिलीप काळभोर यांच्या नावावर एकमत होईना  

भाजप नेते प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरांच्या साथीने सर्वपक्षीय पॅनलची उभारणी केली. प्रशांत काळभोर, दिलीप काळभोर यांसह अन्य काही जणांनी बाजार समिती निवडणूक व्हावी यासाठी पुढाकार घेतला होता. पॅनल उभारणी झालेल्या एका बैठकीमध्ये दिलीप काळभाेर यांना सभापती पद देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे. त्यानुसार मंगळवारी होणाऱ्या सभापती निवडीत दिलीप काळभोर यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल असे वाटत असतानाच प्रदीप कंद यांचे निकटवर्तीय प्रकाश जगताप यांनीही सभापती पदाची इच्छा दर्शवली, तर दुसरीकडे सर्वाधिक मताने विजयी झालेले रोहिदास उंद्रे हेही या रेसमध्ये आल्याने दिलीप काळाभोर यांच्या नावावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. जगताप आणि उंद्रे यांची नाराजी दूर करण्यात सर्वपक्षीय पॅनल प्रमुखांना यश मिळाले तरच दिलीप काळभोर यांच्या निवडीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. शिवाय अन्य काही जणही इच्छुक असून त्यांची नाराजी कशी दूर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आमचे अशोक बापूच बरे...

आमदारकीचे तिकीट न मिळाल्याने राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादीच्या बंडखोरांना भाजपच्या गोटात आणले. त्याच जोरावर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांना धक्का देण्यासाठी जोर लावला आहे. याचे अलीकडेच उदाहरण द्यायचे म्हटले तर हवेली बाजार समिती. शिवाय हवेली तालुक्याचा आमदार हवा असा हवेलीकरांचा सूर आहे. त्याचीही कंद यांना साथ मिळत होती, त्यामुळे आमदार झाल्यासारखेच वातावरण निर्माण झाले होते. पण काही दिवसांपासून प्रदीप कंद यांच्याबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. अनेक जण त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतात. पण ते साधे फोनही उचलत नाहीत. सध्या तर त्यांनी फोन उचलण्यासाठी एक पीए ठेवलाय. निराेप दिलाय दादा फोन करतील एवढेच त्याचे काम. पण फोन काही येत नाही. इकडे प्रस्थापित आमदार अशोक पवार यांना फाेन लावता किमान बोलतात त्यातच समाधान वाटते. त्यामुळे आमचे अशोक बापूच बरे म्हणण्याची वेळ हवेलीकरांवर आली असल्याचे एका कार्यकर्त्याने सांगितले. 

Web Title: Crowd of aspirants for Speaker's post; Increased headache of the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.