आदिवासी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने सीपीएमने वनविभागाविरोधात केला मार्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 02:04 AM2018-12-29T02:04:43+5:302018-12-29T02:05:30+5:30

जव्हार तालुक्यातील बहुतांश डोंगराळ भागातील शेतकरी हा पारंपारिक पद्धतीने शेती करीत असून, शेतीसाठी झाडांच्या फाद्यांची छाटनी करून राबणी (भाजणी) करतो.

CPI (M) March against Forest Department, after filing of criminal cases against tribal farmers | आदिवासी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने सीपीएमने वनविभागाविरोधात केला मार्च

आदिवासी शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने सीपीएमने वनविभागाविरोधात केला मार्च

Next

जव्हार : तालुक्यातील बहुतांश डोंगराळ भागातील शेतकरी हा पारंपारिक पद्धतीने शेती करीत असून, शेतीसाठी झाडांच्या फाद्यांची छाटनी करून राबणी (भाजणी) करतो.

त्यानंतर भात, नागली, वरई, पिकांची रोपं तयार करतो. अशा प्रकारे पारंपारिक शेती करताना झाडांच्या फांद्या तोडणाºया शेतकºयांवर जव्हार उपवन संरक्षक अमित मिश्रा यांच्या आदेशाने वनविभागाचे कर्मचारी गुन्हे दाखल करीत आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आक्र मक झाले असून, शुक्र वारी जव्हार उपवन संरक्षक यांच्या कार्यालायवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृवाखाली हजारोंच्या संख्येने जव्हार बसस्थानक ते वनविभाग उपवन संरक्षक यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.

तालुक्यातील शेती ही डोंगराळ भागातील असून, झाडांचा पालापाचोळा व झाडांच्या फाद्यांची छाटनी केल्याशिवाय शेतीची भाजणी होत नाही. मात्र, शेतीची राबणी (भाजणी) करण्यासाठी झाडांच्या फाद्यांची छाटनी करणाºया शेतकºयांवर वनविभागाने गुन्हे दाखल करायला लावले आहेत. शेतकºयांच्या म्हणण्यानुसार आम्ही झाडांचा शेंडा किंवा संपूर्ण झाडांची तोडणी करीत नाही. तर पालापाचोळा व लहानसहान मोजक्या फांद्या तोंडून राब करतो. तसेच आमची डोंगराळ भागातील बहुतांश शेती असल्याने आम्ही पिढोंन पिढ्या शेती करीत आहोत.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृवाखाली काढलेल्या या मोर्चा दरम्यान प्रांत कार्यालयाच्या शेजारी शेतकºयांची भव्य सभा घेऊन शेतक-यांना वणी दिंडोरीचे आमदार जे.पी. गावित व जि. प.सदस्य रतन बुधर यांनी मार्गदर्शन केले. या मोर्चाचे आयोजन करण्यासाठी प.स.सदस्य- यशवंत घाटाळ, प.स. सदस्य लक्ष्मण जाधव, राजा गहाला, किरण गहाला,चिंतू कलन, ताई बेंदर, तसेच शिवराम बुधर यांनी पुढाकार घेतला होता.

झाडांची वाढ खुंटेल अशी कटाई करीत नाही वनविभागाने गुन्हे मागे घ्यावे

आंदोलनकत्या शेतकºयांच्या म्हणण्यानुसार आम्ही कुठल्याही झाडांची वाढ खुंटेल अशी कटाई करीत नाही. परंतु वनविभागाने शेतकºयांवर झाडांच्या कत्तली बाबत केलेली कारवाई ही चुकीची असून, वनविभागाने दाखल केलेले गुन्हे हे चुकीचे आहेत. शेतकºयांनी जंगलाची कुठलीही नुकसान केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर वनविभागाकडून होत असलेली कारवाई थांबवावी व या शेतकºयांना झाडांच्या फांद्या, पालापाचोळा गोळा करण्यासाठी मुभा द्यावी यासाठी वनविभागावर धडक मोर्चा काढण्यात आला.

Web Title: CPI (M) March against Forest Department, after filing of criminal cases against tribal farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.