Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी २३७ कोरोनाबाधितांची वाढ; ४७७ जण झाले ठणठणीत बरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2021 10:22 PM2021-01-02T22:22:55+5:302021-01-02T22:23:22+5:30

शहरात आजपर्यंत ९ लाख २५ हजार १७९ जणांची कोरोना तपासणी

Corona Virus News : 237 corona new infestations in Pune on Saturday; 477 people were cured | Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी २३७ कोरोनाबाधितांची वाढ; ४७७ जण झाले ठणठणीत बरे 

Corona Virus News : पुणे शहरात शनिवारी २३७ कोरोनाबाधितांची वाढ; ४७७ जण झाले ठणठणीत बरे 

googlenewsNext

पुणे : शहरात शनिवारी २३७ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, ४७७ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात ३ हजार ८४४ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ६.१६ टक्के इतकी आहे.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २५७ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, यापैकी १६५ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर शहरातील ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ६३० इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ३ हजार ४६ वर आली असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे़ यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत़  शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ६४० इतकी झाली आहे. 
शहरात आजपर्यंत ९ लाख २५ हजार १७९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ७९ हजार ३०८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ७१ हजार ६२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Web Title: Corona Virus News : 237 corona new infestations in Pune on Saturday; 477 people were cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.