पुणे शहराची नवी ओळख निर्माण करणा-या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला आजपासून सुरुवात होणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 05:25 AM2017-09-28T05:25:00+5:302017-09-28T05:25:21+5:30

शहराची नवी ओळख निर्माण करणा-या मेट्रो रेल या प्रकल्पाची कुदळ गुरुवारी (दि. २८) पडणार आहे. वनाज ते रामवाडी या मार्गाच्या कामाची ही सुरुवात असेल.

The construction of the Metro project, which has created a new identity for Pune city, will start from today | पुणे शहराची नवी ओळख निर्माण करणा-या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला आजपासून सुरुवात होणार 

पुणे शहराची नवी ओळख निर्माण करणा-या मेट्रो प्रकल्पाच्या कामाला आजपासून सुरुवात होणार 

पुणे : शहराची नवी ओळख निर्माण करणा-या मेट्रो रेल या प्रकल्पाची कुदळ गुरुवारी (दि. २८) पडणार आहे. वनाज ते रामवाडी या मार्गाच्या कामाची ही सुरुवात असेल. कोथरूडमध्ये वनाज कंपनीच्या समोर किनारा हॉटेलच्या जवळ सकाळी साडेनऊ वाजता हा कुदळ मारण्याचा कार्यक्रम होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते कुदळ मारण्यात येईल. महापौर मुक्ता टिळक, आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आदी यावेळी उपस्थित असतील.
महामेट्रो कंपनीच्या वतीने (महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन) हे काम करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील सर्व शहरांमधील मेट्रोचे काम करण्यासाठी ही खास कंपनी स्थापन करण्यात आली आहे. नागपूरमधील मेट्रोचे कामही याच कंपनीच्या वतीने करण्यात येत आहे. मेट्रोचा दुसरा मार्ग पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असा आहे. त्याचे काम याआधीच रेंजहिल्स कॉर्नरपासून सुरू करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असणाºया या प्रकल्पाच्या कामाला आता सुरुवात होत असून सुरू झाल्यापासून साधारण
४ वर्षांत मेट्रो पुण्यातील रस्त्यांवरून प्रत्यक्षात धावू लागेल, असा विश्वास महामेट्रोच्या अधिकाºयांनी व्यक्त
केला आहे.

Web Title: The construction of the Metro project, which has created a new identity for Pune city, will start from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.