तंटामुक्ती अध्यक्षासाठी गोंधळ; निवड महिनाभर प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 02:12 AM2018-11-02T02:12:02+5:302018-11-02T02:12:14+5:30

मपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षनिवडीवरून गदारोळ झाला. अखेर तंटामुक्ती अध्यक्षांची निवड प्रलंबित ठेवून पुढील महिन्यात घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

Confusion for the Chancellor Chancellor; Selection lasts for a month | तंटामुक्ती अध्यक्षासाठी गोंधळ; निवड महिनाभर प्रलंबित

तंटामुक्ती अध्यक्षासाठी गोंधळ; निवड महिनाभर प्रलंबित

Next

शेलपिंपळगाव : येथील ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षनिवडीवरून गदारोळ झाला. अखेर तंटामुक्ती अध्यक्षांची निवड प्रलंबित ठेवून पुढील महिन्यात घेण्याचे ठरविण्यात आले आहे. सरपंच विद्या मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात विविध विकास विषयांसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी उपसरपंच अनिल पोतले, ग्रामपंचायत सदस्य गणेश दौंडकर, नितीन मोहिते, सागर पोतले, संदीप मोहिते, योगेश दौंडकर, सुनीता मोहिते, सुमन मोहिते, सुनंदा औटी, संगीता गायकवाड, मंगल पोतले, लीलाबाई दौंडकर, आशा मोहिते आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामसभेच्या प्रारंभी ग्रामसेवक उत्तम कांबळे यांनी ग्रामपंचायतीच्या विविध विषयांचे ग्रामस्थांसमोर वाचन केले.
ग्रामसभेला उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करून उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी करून अजेंड्यावरील विषय मान्य केले. विशेषत:, पेयजल योजना कार्यान्वित करणे, १४व्या वित्त आयोग निधीतून विकासकामे करणे, कचरा व्यवस्थापन घंटागाडी पुन्हा सुरू करणे, नागरिकांची जॉबकार्डे बनविणे आदी विषय मंजूर करण्यात आले. तसेच, ग्रामसमिती, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता समिती, पाणीपुरवठा समिती स्थापन करण्यात आली. ग्रामसभेच्या शेवटी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षनिवडीचा विषय ग्रामसभेत मांडण्यात आला.

पोलिसांमुळे शांतता
तंटामुक्ती अध्यक्षपदासाठी ६ पुरुष व २ महिलांचे असे एकूण ८ अर्ज दाखल करण्यात आले होते. परंतु, अध्यक्षनिवडीबाबत एकमत न झाल्याने ग्रामसभेची सांगता करण्यात आली. दरम्यान, ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. चाकण पोलिसांनी कडक बंदोबस्तामुळे तणाव निवळला.

Web Title: Confusion for the Chancellor Chancellor; Selection lasts for a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे