क्रिएटिव्हच्या महिला कर्मचा-यांना कोठडी

By admin | Published: November 17, 2014 05:11 AM2014-11-17T05:11:44+5:302014-11-17T05:11:44+5:30

आकुर्डीतील क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमीच्या दोन महिला कर्मचाऱ्यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली असून, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

The closure of the Creative Women's staff | क्रिएटिव्हच्या महिला कर्मचा-यांना कोठडी

क्रिएटिव्हच्या महिला कर्मचा-यांना कोठडी

Next

पिंपरी : आकुर्डीतील क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमीच्या दोन महिला कर्मचाऱ्यांना देहूरोड पोलिसांनी अटक केली असून, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुजाता महावीर जैन (वय ४४, रा. रावेत), मयूरी गिरिधारी तपस्वी (वय ४५, रा. आकुर्डी) अशी अटक केलेल्या महिलांची नावे आहेत. अ‍ॅकॅडमीतील मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी नौशाद अहमद शेख (वय ५३, रा. आकुर्डी) या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख याच्यावर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी शनिवारी क्रिएटिव्ह अ‍ॅकॅडमीसमोर लोकप्रतिनिधींसह पालकांनी आंदोलन केले.
दरम्यान, शेख याला मदत करणाऱ्या जैन व तपस्वी यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
शेखवर गुन्हा दाखल आहे. त्याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. यावर सोमवारची
सुनावणी होईपर्यंत शेखवर कारवाई करू नये, असा आदेश
असल्याची माहिती पोलीस
निरीक्षक अमरनाथ वाघमोडे
यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: The closure of the Creative Women's staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.