पुणे शहराचा कचरा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 05:41 AM2018-07-31T05:41:19+5:302018-07-31T05:41:31+5:30

राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिकेच्या वतीने येथील कचरा डेपोवरील ओपन डंपिंग बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे १ आॅगस्टपासून फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने ओपन डंपिंगच्या विरोधात कचऱ्याच्या गाड्या अडविण्याचा इशारा दिला आहे.

 The city's garbage question marks the signs of an error | पुणे शहराचा कचरा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे

पुणे शहराचा कचरा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे

googlenewsNext

पुणे : राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या निर्णयानुसार महापालिकेच्या वतीने येथील कचरा डेपोवरील ओपन डंपिंग बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळे १ आॅगस्टपासून फुरसुंगी ग्रामस्थांच्या वतीने ओपन डंपिंगच्या विरोधात कचऱ्याच्या गाड्या अडविण्याचा इशारा दिला आहे. यामुळे पुणे शहराच्या कचºयाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येणार आहे.
दरम्यान, फुरसुंगीमधील आतापर्यंत झालेली सर्व बांधकामे नियमित केली जावीत. महापालिका निवडणुका होईपर्यंत पूर्वीप्रमाणे कराची अंमलबजावणी केली जावी या प्रमुख मागण्यासाठी हा कचºयाच्या गाड्या अडविण्याचा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा महापालिकेत आहे. या वेळी ग्रामस्थांच्या दबावाला बळी न पडण्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बुधवारी ग्रामस्थ काय भूमिका घेणार याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
आश्वासनांची पूर्तता न झाल्याचे कारण देत येत्या १ आॅगस्टपासून पुन्हा कचरा डेपो बंद आंदोलनाचा इशारा कृती समितीने महापालिकेला दिला आहे. मात्र कृती समितीने केलेल्या मागण्याही धक्कादायक असल्याचे समोर आले, या दोन्ही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहे. त्यावर आता समितीने आतापर्यंत झालेली सर्व बांधकामे नियमित करून त्यांना पालिकेच्या नियमाप्रमाणे करआकारणी करावी. निवडणूक होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीप्रमाणे कराची अंमलबजावणी करावी अशा अजब मागण्या करून महापालिकेची कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्यात नव्याने समाविष्ट ११ गावांच्या प्रश्नांबाबत बैठक घेतली.

महापालिकेच्या वतीने उरुळी देवाची येथील कचरा डेपोत ओपन डंपिंग केले जाते. परंतु कायद्यानुसार ओपन डंपिंगला बंदी आहे. न्यायालयाने ओपन डंपिंग बंद करण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.
या विरोधात ग्रामस्थांनीदेखील वेळोवेळी आंदोलने केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांसह महापालिकेने ग्रामस्थांना कचरा डेपो बंद करण्याबरोबरच येथील विकासकामांची आश्वासने दिली आहे. त्यानुसार महापालिकेकडून ही कामेही
सुरू
आहेत.
उरुळी देवाची आणि
फुरसुंगी या दोन्ही गावांमधील विकासकामांसाठी प्रशासनाने आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला
आहे. मात्र, असे असताना
आता ग्रामस्थांनी पुन्हा
एकदा महापालिकेला
वेठीस धरण्याचे पाऊल उचलले आहे.

Web Title:  The city's garbage question marks the signs of an error

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे