Pune: चाकण-शिक्रापूर रस्त्यावर कारची कंटेनरला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 03:58 PM2023-07-12T15:58:00+5:302023-07-12T16:00:06+5:30

चाकण-शिक्रापूर रोडवरील मोहितेवाडी परिसरात हा अपघात घडला...

Car collides with container on Chakan-Shikrapur road; Two youths died on the spot | Pune: चाकण-शिक्रापूर रस्त्यावर कारची कंटेनरला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Pune: चाकण-शिक्रापूर रस्त्यावर कारची कंटेनरला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

googlenewsNext

शेलपिंपळगाव (पुणे) :चाकण - शिक्रापूर रस्त्यावर भरधाव वेगात जाणाऱ्या कारने कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. अपघातात कारचालक आणि कारमधील सहप्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. चाकण-शिक्रापूर रोडवरील मोहितेवाडी परिसरात हा अपघात घडला.

आदित्य धर्मा मेमाने (वय २७, रा. कुरुळी, ता. खेड) व अमोल व्यंकटराव लोमटे (वय ३२) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रुग्णवाहिकाचालक दिनेश जोगदंड यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आदित्य मेमाने आणि त्यांचा मित्र अमोल लोमटे चाकण - शिक्रापूर रोडने कारमधून (एमएच १४ जेयु ४२४८) जात होते. आदित्यने कार वेगात चालवून समोरील कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यात आदित्य आणि अमोल यांचा मृत्यू झाला.

Web Title: Car collides with container on Chakan-Shikrapur road; Two youths died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.