इमारती कोसळल्या; पण देवदूतांनी वाचविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 03:45 AM2018-12-09T03:45:30+5:302018-12-09T03:45:51+5:30

आपत्ती व्यवस्थापन दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिके; गुजरात व महाराष्ट्राचा संयुक्तसराव

Buildings collapse; But the angels saved | इमारती कोसळल्या; पण देवदूतांनी वाचविले

इमारती कोसळल्या; पण देवदूतांनी वाचविले

Next

पुणे : शनिवारचा दिवस.. सर्व नागरिक आपल्या रोजच्या व्यवहारात मग्न असताना अचानक जमीन हादरते अन् क्षणार्धात टोलेजंग इमारती पत्त्यासारख्या कोसळातात. या उंच इमारतींच्या ढिगाऱ्याखाली शेकडो नागरिक अडकतात.. काही क्षणातच आपत्ती निवारणाचे पथक घटनास्थळी दाखल होते अन् सुरू होते नागरिकांना वाचविण्याची धडपड. अत्याधुनिक साधनांच्या साह्याने ढिगाºयाखालील नागरिकांना बाहेर काढले जाते. त्यांना प्रथमोपचार देत सुरक्षित स्थळी नेत भूकंपासारख्या आपत्तीच्या काळात कशा पद्धतीने नेले जाते याचे प्रात्यक्षिक राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) जवानांनी दाखविले.

सुदुंबरे येथील राष्ट्रीय आपत्ती निवारण केंद्राच्या (एनडीआरएफ) पाचव्या तुकडीच्या मुख्य कार्यालयात शनिवारी गुजरात आणि महाराष्ट्र राज्याच्या आपत्ती निवारण पथकाचे पहिला संयुक्त बचाव सराव शनिवारी पार पडला. या वेळी कोयना धरण परिसरात झालेल्या भूकंपामुळे पुणे आणि सातारा परिसरात इमारती कोसळल्यास तातडीने करण्यात येणाºया आपत्ती निवारणाचे प्रात्यक्षिक दाखविले. जवानांच्या वेगवान आणि धडक निर्णयाच्या या प्रात्यक्षिकांमुळे उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे राहिले.

आपत्ती निवारण कार्यात राज्य आपत्ती निवारण पथकांना बळकटी मिळावी, यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाद्वारे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. याच उपक्रमांतर्गत या पहिल्या आंतरराज्यीय संयुक्त सरावाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्र व गुजरात राज्याच्या आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अधिकारी, आपत्ती निवारण पथक तसेच विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारी सहभागी झाले होते. एनडीआरएफचे महासंचालक संजीव कुमार यांच्या हस्ते या सरावाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. या वेळी एनडीआरएफच्या अतिरिक्त महासंचालक अर्चना त्यागी, पोलीस महानिरीक्षक रावसाहेब शिंदे उपस्थित होते. कुमार म्हणाले, ‘‘आपत्ती निवारणासाठी अशाप्रकारच्या संयुक्त सरावांमुळे आंतरराज्यीय स्तरावर राज्यांना एकमेकांच्या संसाधनाचा उपयोग करणे सोपे होणार आहे. तसेच याद्वारे एनडीआरएफच्या कार्यक्षमतेत बदल करण्याण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेतला जाणार आहे. भविष्यात या सारखे आणखी सराव करण्याचे नियोजन एनडीआरफचे आहे.’’

आधुनिक साधनांचा प्रभावी वापर
भूकंपात ढिगाºयाखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या जवानांपुढे मोठे आव्हान असते.
या संयुक्त सरावात आधुनिक कॅमेºयांचा वापर करत ढिगाºयाखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यात आला. या आधुनिक साधनांच्या वापरामुळे एनडीआरएफ आधुनिक साधनांनी सज्ज असल्याची प्रचिती उपस्थितांना आली.

देशात ३६ राज्यस्तरीय आपत्ती निवारण पथक
भारतात दरवर्षी नैसर्गिक तसेच मनुष्यनिर्मित आपत्तीमध्ये अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागतात. तसेच मोठ्या प्रमाणात साधनसंपत्तीचे नुकसान होते. यामुळे आपत्ती निवारण क्षेत्रात क्षमता वाढविण्यासाठी एनडीआरएफतर्फे प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासाठी लक्ष देत राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाला सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणजे देशातील ३६ राज्यांत जवळपास राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या धर्तीवर ३६ नवे राज्यस्तरीय आपत्ती निवारण पथके स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून आपत्ती निवारणासंदर्भात मोठे काम केले जात आहे.
- संजीव कुमार, महासंचालक, एनडीआरएफ

Web Title: Buildings collapse; But the angels saved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.