मुळशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 03:54 PM2018-10-01T15:54:08+5:302018-10-01T15:54:38+5:30

दुसऱ्या दिवशी (ता.१ ऑक्टोबर) रोजी सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू केल्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विपुल याचा मृतदेह शोधण्यात यश आले.

The body of a young man sinked in Mulshi dam was found | मुळशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

मुळशी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

Next

पौड : मुळशी धरणात बुडालेल्या विपुल सक्सेना या तरुणाचा मृतदेह सापडला. विपुल सक्सेना (वय २९ वर्षे) व त्याचा मित्र हिमांशु चंदवानी हे दोघेजण ता.३० रोजी दुपारी ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास मुळशी धरणात पोहण्यासाठी उतरले असताना विपुल पाण्यात बुडाला होता.

पौड पोलिसांनी तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक लोकांचे मदतीने तात्काळ शोध कार्य सुरु केले होते. दुसऱ्या दिवशी (ता.१ ऑक्टोबर) रोजी सकाळपासून पुन्हा शोध कार्य सुरू केल्यानंतर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास विपुल याचा मृतदेह शोधण्यात यश आले.

या शोध मोहिमेत मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापनचे कार्यकर्ते प्रमोद बलकवडे व त्यांचे सहकारी अमित कोतवाल, शंकर वरपे, कैलास परदेशी, सागर जाबरे, निलेश कुसाळकर, कर्णिक शहा, पंढरीनाथ जोरी, नामदेव गुंजाळ, विनायक जोरी यांनी विपुलचा शोध घेण्यासाठी परिश्रम घेतले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे पौड पोलिसांनी कळविले आहे.


सहा महिन्यांतील 8 वी घटना
मागील सहा माहिन्यात मुळशी तालुक्यातील धरण व अन्य जलसाठ्यात बुडून मरण्याची ही आठवी घटना आहे. तर एक घटना देवकुंड धबधब्यात घडली होती. यात बुडणारे हे बहुतेक तरुणच आहेत. व त्यातही धरणात बुडणाऱ्यांमध्ये परप्रांतीय तरुण अधिक आहेत. एप्रिल महिन्यात पिंपळोली -खांबोली येथील धरणात तीन शिबिरार्थी व अन्य एक असे चार जण बुडाले . तर त्यानंतर जुलै माहिन्यात एकजण वरसगाव धरणात, ऑगस्ट महिन्यात एकजण मुठा नदीपात्रात, सप्टेंबर महिन्यात बोतरवाडी दोघेजण स्थानिक तरुण येथील शेततळ्यात, एक जण मुळशी धरणात, तसेच अन्य एका घटनेत अंबडवेट येथील दोघेजण बुडाले होते.मागील आठवड्यात देवकुंड धबधब्यात दोघेजण बुडाले . या आठवड्यात मुळशी धरणात विपुलचा बळी गेला. 


मुळशी धरणाला टाटा कंपनीने धरणाच्या बाजूने जागोजागी सुरक्षा भिंती तसेच सुरक्षा रक्षक नियुक्त असले तरी या भागात फिरायला येणारे उत्साही तरुण चोरून धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरतात. अनेकांना येशील पाण्याची खोलीचा व प्रवाहाचा अंदाज नसल्याने अशा बुडण्याच्या घटना घडतात. यात शिक्षण व नोकरी निमित्ताने पुण्यात शिक्षणासाठी आलेले तरुण या भागात फिरायला आल्यानंतर असे जीवावर बेतणारे धाडस करतात आणि अपघात ओढवून घेतात. तरुणांना फिरायला जाताना घ्यावयाची काळजी यासंबंधीची माहिती त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी व महाविद्यालयांमध्ये देण्याची गरज असल्याचे मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख प्रमोद बलकवडे यांनी सांगितले.
- प्रमोद बलकवडे, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख

Web Title: The body of a young man sinked in Mulshi dam was found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.