भोरला राजकीय आखाडा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 02:47 AM2018-06-16T02:47:07+5:302018-06-16T02:47:07+5:30

नगरपालिकेचा पंचवार्र्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे. ख-या अर्थाने निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होईल.

Bhola political arena started | भोरला राजकीय आखाडा सुरू

भोरला राजकीय आखाडा सुरू

Next

भोर : नगरपालिकेचा पंचवार्र्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, निवडणुकीची आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे. ख-या अर्थाने निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होईल.
भोर नगरपालिकेची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत यापूर्वीच जाहीर झाली आहे. आज नगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता राहणार आहे. शहराची लोकसंख्या २० हजाराच्या आसपास असून, २ वॉर्डचे ७, तर ३ वॉर्डचा एक, असे एकूण ८ प्रभाग आहेत. नव्यानेच प्रभाग करण्यात आल्याने अनेक वॉर्ड विखुरले गेले आहेत. यामुळे अनेकांची निवडणुकीत दमछाक होणार आहे. यात शहरातील चार ते पाच झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. एकूण १५ हजार २०० मतदार आहेत. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून, नगरपालिकेत ९ जागा महिलांसाठी राखीव असल्याने नगराध्यक्षासह एकूण १० महिला राहणार असून, पालिकेवर महिलाराज असणार आहे.
निवडणुकीचे मतदान १५ जुलै सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत, मतमोजणी १६ जुलै सकाळी १० वाजल्यापासून होणार असल्याचे मुख्याधिकारी संतोष वारुळे यांनी सांगितले.

चौरंगी लढतीची शक्यता
या वेळी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने सर्वच पक्षांतील इच्छुकांची संख्या वाढली आहे. सत्ताधारी काँग्रेसकडे सर्वाधिक इच्छुक आहेत. उमेदवारी जाहीर होण्याआधी काहींनी प्रचारही सुरू केला आहे. शहरात सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना अशी चौरंगी लढत होणार असून, काँग्रेस सत्ता टिकविण्यासाठी, तर राष्ट्रवादी व भाजपा सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 
१९५५ ते १९६७या कालावधीत लाल निशाण पक्षाचे दिवंगत आमदार जयसिंग माळी यांच्या विचारांचा आणि कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव भोर शहरावर १० ते १५ वर्षे राहिला. १९७० मध्ये काँगेसची सत्ता आली.
१९७४ ते १९९० पर्यंत दिवंगत अमृतलाल रावळ यांच्या गटाकडे भोर शहराची सत्ता होती.
- १९९० नंतर अनंतराव थोपटे यांनी नगरपालिकेची सत्ता मिळवली. २००८चा अडीच वर्षांचा कार्यकाळ पालिकेची सत्ता राष्ट्रवादीकडे गेली. मात्र, त्यांच्यातील अंतर्गत वादामुळे पुन्हा सत्ता काँग्रेसकडे आली होती.
 

Web Title: Bhola political arena started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.