दारुच्या भांडणातून शिक्रापुरात मारहाण; तिघांनी केला एका कामगाराचा खून, दोघे फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 04:13 PM2018-02-24T16:13:52+5:302018-02-24T16:13:52+5:30

दारू पिण्याच्या कारणाहून एका कामगाराचा तिघांनी खून केल्याचा प्रकार शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे घडला आहे. पोलिसांनी खून करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.

Beaten incident in Shikrapur; one worker killed, two fugitive | दारुच्या भांडणातून शिक्रापुरात मारहाण; तिघांनी केला एका कामगाराचा खून, दोघे फरार

दारुच्या भांडणातून शिक्रापुरात मारहाण; तिघांनी केला एका कामगाराचा खून, दोघे फरार

Next
ठळक मुद्देघनशाम विद्यानाथ पटेल (वय ४०) असे खून झालेल्या कामगाराचे नावगुन्ह्यातील नागेंद्र राजभर व राजेंद्र राजभर हे दोघे सख्खे भाऊ फरार

शिक्रापूर : दारू पिण्याच्या कारणाहून एका कामगाराचा तिघांनी खून केल्याचा प्रकार शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे घडला आहे. पोलिसांनी खून करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे.
घनश्याम विद्यानाथ पटेल (वय ४०, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, मूळ रा. उरदहा ता. कुशीनगर, जि. कुशीनगर उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्रापूर येथे एका इमारतीमध्ये काम करणारे नागेंद्र राजभर, रवींद्र राजभर, निजाम शेख व घनश्याम पटेल हे चार कामगार राहत असून त्यांचामध्ये दारू पिण्यावरून किरकोळ भांडणे होत होती. बुधवारी देखील या चौघांमध्ये भांडण झाले. यावेळी दारू पिताना झालेल्या भांडणात रवींद्र याने तिघांना देखील तोंडात मारले. त्यावेळी घनशाम याने देखील रवींद्र याला मारले असताना रवींद्र, नागेंद्र व निजाम या तिघांनी मिळून घनश्याम पटेल याला मारहाण केली. त्यावेळी रवींद्र याने घनश्याम याला डोके धरून शेजारील भिंतीवर आदळले. त्यावेळी डोक्याला जबर मार लागल्याने घनशाम हा रक्तबंबाळ झाला. त्यामुळे नागेंद्र राजभर, रवींद्र राजभर, निजाम शेख हे तिघे देखील पळून गेले. त्यांनतर कामगारांचे सुपरवायझर असलेले राजेंद्र शेळके हे त्या ठिकाणी आले असता त्यांना घनशाम हा रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. त्यावेळी त्यांनी शेजारी पहिले असता त्यांना दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसून आल्या. शेळके यांनी घनशाम जवळ जाऊन पहिले असता घनश्याम मृत्युमुखी पडलेला असल्याचे त्यांना दिसून आल. त्याचवेळी शेळके यांचा कामगार रवींद्र यांना फोन आला. तुम्ही कोठे आहे असे विचारले असता आमचे व पटेलचे भांडण झाले असून आम्ही त्याला मारहाण केली आहे असे म्हणून रवींद्र याने फोन कट केला. त्यामुळे त्यांनी शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली. 
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर आरोपींचा शोध घेत असताना एकजण चाकण येथे गेला असल्याचे समजले. माणिक चौक चाकण येथून निजाम उर्फ नजमुद्दीन शेख याला ताब्यात घेतले. या गुन्ह्यातील नागेंद्र राजभर व राजेंद्र राजभर हे दोघे सख्खे भाऊ फरार आहेत.

Web Title: Beaten incident in Shikrapur; one worker killed, two fugitive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.