बारामतीकरांनो मला विश्वास आहे, तुम्ही आम्हालाच पुन्हा संधी द्याल - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 06:50 PM2024-03-11T18:50:33+5:302024-03-11T18:51:16+5:30

मला बारामतीकरांमुळे राज्याचे ४ वेळा मुख्यमंत्री पद, देशांचे संरक्षण मंत्री पद, १० वर्ष कृषी मंत्री पद असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली

Baramatikars I believe you will give us another chance Sharad Pawar | बारामतीकरांनो मला विश्वास आहे, तुम्ही आम्हालाच पुन्हा संधी द्याल - शरद पवार

बारामतीकरांनो मला विश्वास आहे, तुम्ही आम्हालाच पुन्हा संधी द्याल - शरद पवार

बारामती : आताच्या ज्या तुमच्या खासदार आहेत. त्या देशातील ५१८ खासदरापैकी त्यांचा पहिल्या तीन मध्ये क्रमांक आहे. शिवाय संसदेत ९८ टक्के हजेरी आहे. त्यामुळे अशा खासदाराला तुम्हाला पुन्हा एकदा संधी द्यायची आहे, मला विश्वास आहे ती संधी तुम्ही पुन्हा एकदा द्याल. यावेळी चित्र वेगळं आहे ,पण त्याची चिंता करायचे कारण नाही. असे म्हणत शरद पवारांनीबारामतीकरांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. 

बारामती शहरातील पक्ष कार्यालयाला भेट दिली. यावेळी पवार यांचे कार्यकर्त्यांशी जोरदार घोषणाबाजीने स्वागत केले.  पवार म्हणाले की, आतापर्यंत जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीत बारामती आणि महाराष्ट्राने मला मागे पाहायला लावलेले नाही. प्रत्येक निवडणुकीत मला सहकार्य केले. मी कधी प्रचाराला येत नसे, तुमच्यापैकी काहींना आठवत असेल माझी शेवटची सभा मिशन हायस्कूल जवळ झाली होती. यातून मला महाराष्ट्राचे शासन, समाजकारण चालवण्याची संधी मला मिळाली. यातून मला बारामतीकरांमुळे राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री पद, देशांचे संरक्षण मंत्री पद, दहा वर्ष कृषी मंत्री पद असे अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली. 

२६ व्या वर्षी निवडणूक लढण्याची संधी

मला वयाच्या २६ व्या वर्षी निवडणूक लढण्याची संधी मिळाली. त्यावेळी माझ्याविरोधात एका साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. मात्र त्यावेळी हा तरुण मुलगा कारखान्याच्या चेअरमनला कसा टक्कर देईल. पण मी सभेत चक्कर टाकल्यानंतर माझी निवडणूक ही माझी राहिलीच नाही. संपूर्ण निवडणूक तरुण पिढीने हातात घेतली. सायकलवर माझा प्रचार केला. समाजातील लहान घटकाने ही निवडणूक हातात घेतली आणि सत्तर हजार मतांनी मला निवडून दिलं,अशा  शब्दात  शरद पवार यांनी त्यांच्या  पहिल्या निवडणुकीची आठवण सांगितली.

Web Title: Baramatikars I believe you will give us another chance Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.