बालभारतीने घ्यावा ‘दुर्गापर्व’ पुरवणीचा आधार; पुणे शहर युवक काँग्रेसची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 03:51 PM2017-11-23T15:51:48+5:302017-11-23T15:56:48+5:30

इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या ‘दुर्गापर्व’ या विशेष पुरवणीने त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडला आहेत.

balbharti should help 'Durgaparva' supplement; Pune city Youth Congress demand | बालभारतीने घ्यावा ‘दुर्गापर्व’ पुरवणीचा आधार; पुणे शहर युवक काँग्रेसची मागणी

बालभारतीने घ्यावा ‘दुर्गापर्व’ पुरवणीचा आधार; पुणे शहर युवक काँग्रेसची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्देपुरवणीतून उलगडण्यात आले इंदिरा गांधींचा मुत्सद्दीपणा, दुरदृष्टी, निर्णयक्षमता असे विविध पैलु मंत्री व अधिकाऱ्यांना भेटून आक्षेपार्ह मजकूर वगळण्याची मागणी

पुणे : इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केलेल्या ‘दुर्गापर्व’ या विशेष पुरवणीने त्यांचा संपूर्ण जीवनपट उलगडला आहेत. त्यामुळे ‘बालभारती’ने अभ्यासक्रमात त्यांच्याविषयी दिलेल्या अपुऱ्या व बदनामीकारक माहितीत बदल करण्यासाठी ‘दुर्गापर्व’ या पुरवणीचा आधार घ्यावा, अशी मागणी शहर युवक काँग्रेसने केली आहे. 
‘लोकमत’च्या ‘दुर्गापर्व’ या विशेष पुरवणीचे सर्वत्र कौतुक होत आहे. इंदिरा गांधींचा मुत्सद्दीपणा, दुरदृष्टी, निर्णयक्षमता असे विविध पैलु या पुरवणीतून उलगडण्यात आले आहेत. त्यांच्या या गुणांवर राजकारणासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोहोर उमटवली आहे. युवक काँग्रेसच्या वतीने ही पुरवणी गुरूवारी ‘बालभारती’ला भेट देण्यात आली. यावेळी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष विकास लांडगे, प्रवक्ते हनुमंत पवार, संतोष पाटोळे, राहूल सिरसाठ, वाहिद निलगर, विशाल मलके, विशाल जाधव, प्रताप शिळीमकर, जीवन पिसाळ, हनान पंडित आदी उपस्थित होते. युवक काँग्रेसने या पुरवणीविषयी ‘लोकमत’चे आभारही मानले.
‘बालभारती’च्या इयत्ता नववीच्या पुस्तकात इंदिरा गांधी व राजीव गांधी यांच्याविषयी बदनामीकारक व अपुरी माहिती देण्यात आली आहे. इंदिरा गांधी यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. मात्र, पुस्तकामध्ये केवळ त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचे श्रेत्र मात्र त्यांना देण्यात आलेले नाही. याविरोधात काँग्रेसने आंदोलनही केले. मंत्री व अधिकाऱ्यांना भेटून आक्षेपार्ह मजकूर वगळण्याची मागणी करण्यात आली. इंदिरा गांधी यांच्या कार्याला पुस्तकामध्ये पुर्ण न्याय मिळाला नाही. पण ‘लोकमत’च्या विशेष पुरवणीमध्ये त्यांच्या सर्व गुण उलगडले आहेत. त्यामुळे ही पुरवणी ‘बालभारती’ला भेट देण्यात आली. ‘बालभारती’च्या संपादकीय मंडळाने या पुरवणीचा अभ्यास करून त्याचा आधार घेत त्यानुसार पुस्तकात योग्य बदल करावेत, हा यामागचा उद्देश आहे, असे लांडगे यांनी सांगितले.

Web Title: balbharti should help 'Durgaparva' supplement; Pune city Youth Congress demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.