रूढी, परंपरा, अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न - दादासाहेब सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 02:15 AM2017-11-29T02:15:49+5:302017-11-29T02:15:58+5:30

दलित स्वयंसेवक संघ हा शाहू, फुले, आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, धर्मनिरपेक्ष आणि सामुदायिक नेतृत्व या वैचारिक पायांवर उभा आहे. रचनात्मक व विधायक दृष्टीने कार्य करण्यासाठी दलित स्वयंसेवक संघाची स्थापना महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीदिनी २८ नोव्हेंबर १९७७ रोजी पुण्यात करण्यात आली़

 Attempts to destroy customs, traditions, superstitions - Dadasaheb Sonawane | रूढी, परंपरा, अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न - दादासाहेब सोनवणे

रूढी, परंपरा, अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न - दादासाहेब सोनवणे

Next

दलित स्वयंसेवक संघ हा शाहू, फुले, आंबेडकर व अण्णा भाऊ साठे यांच्या समता, स्वातंत्र्य, बंधुभाव, धर्मनिरपेक्ष आणि सामुदायिक नेतृत्व या वैचारिक पायांवर उभा आहे. रचनात्मक व विधायक दृष्टीने कार्य करण्यासाठी दलित स्वयंसेवक संघाची स्थापना महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथीदिनी २८ नोव्हेंबर १९७७ रोजी पुण्यात करण्यात आली़ यंदा हा संघ ४० वा वर्धापन दिन साजरा करीत आहे़ समाजातील रूढी, परंपरा आणि अंधश्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न संघाने आजवर केला आहे़ दलित स्वयंसेवक संघाचे संघप्रमुख आणि अण्णा भाऊ साठे स्मारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना सांगितले़

दलितांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वयंस्फूर्तीने सेवा करणारी संघटना या अर्थाने सहज अर्थ या नावात आहे. दलित चळवळीतील अपेक्षित उद्दिष्टे समोर ठेवून वादाला महत्त्व न देता सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वरूपाचा सामुदायिक नेतृत्वाने स्वीकार केला पाहिजे, अशा विचाराने दलित स्वयंसेवक संघाची उभारणी केली गेली. संसदीय राजकारणापासून अलिप्त राहून आजतागायत ४० वर्षे दलित स्वयंसेवक संघ कार्यरत आहे.
‘समाज को बदल डालो’ हे संघाचे ब्रीदवाक्य आहे. भारतातील वर्गीय/जातीय शोषण, अस्पृश्यता, अनिष्ट रूढी, परंपरा नष्ट करून श्रमाला प्रतिष्ठा मिळावी यासाठी सदस्य प्रतिज्ञापत्रावर स्व-रक्ताने सही करून सामाजिक, परिवर्तनाच्या कामी रक्त सांडण्याचा निर्धार व्यक्त करतात. २६ जून १९७८ रोजी आळंदी येथून दर वर्षी निघणाºया वारकरी दिंंड्यांत दलितांच्या दिंंड्या पुढे सारून जातीयता निर्माण केल्याने त्याविरुद्ध हराळे वैष्णव समाज व दलित स्वयंसेवक संघाने सत्याग्रह करून मानाचे घोडे सर्वांत पुढे करा व सवर्णांच्या दिंड्यांमध्ये समावेश करा, अशी मागणी केली. त्याला न्यायालयाने रूढ प्रथा रद्द ठरवून न्याय दिला.
समाजाचे अंतरंग पोखरून काढणाºया रूढी, परंपरा व अंधश्रद्धा उखडून नष्ट करण्यासाठी संघाने प्रयत्न केले. चंद्रग्रहणासंबंधी अंधश्रद्धा असणाºया जाती ‘दे दान सुटे गिºहाण’ अशी आरोळी मारत असता त्याविरुद्ध, तसेच पोतराज यासारख्या रूढी बंद करण्यासाठी सभा, बैठक, मेळावे यांद्वारे प्रबोधन झाले. २५ जणांच्या गटाने सायकलवर फिरून ग्रहण मागणाºयांना प्रतिबंध केला व १६ फेब्रुवारी १९८० रोजी त्यात आम्ही यशस्वी झालो.
दलित स्वयंसेवक संघ हा एक मोठा वृक्ष आहे आणि त्याला अनेक फांद्या आहेत. त्यापैकी अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था व दुसरी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत या होय. डॉ.बाबा आढाव यांच्या हस्ते गुलटेकडी येथे स्थापन झाली. पुण्यातील झोपडपट्यामधून कागद, काच, पत्रा वेचणाºया लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. अण्णा भाऊ साठे स्मारक संस्थेची स्थापना २१ मार्च १९८६ रोजी झाली. आजपर्यंत ३१ वर्षे संस्थेचे कार्य चालू आहे. रचनात्मक विधायक उपक्रम सातत्याने चालतात. शैक्षणिक, बौद्धिक विकासाकरिता मासिक सभा व व्याख्याने होतात. आजवर ३२९ व्याख्याने झाली आहेत. ग्रंथालय व युवा सर्वांगीण विकास केंद्र चालविले जाते. कलाकारासाठी सांस्कृतिक प्रबोधिनी व मोफत कायदेविषयक सल्ला व निसर्गोपचार केंद्र चालू करण्यात आले.
२३ सप्टेंबर २००३ रोजी अण्णा भाऊंचा जागर हे अभिनव आंदोलन समितीने केले. पुणे महापालिकेने व्यापारी तत्त्वावर स्मारक करण्याचा ठराव रद्द करावा आणि स्वखर्चाने बिबवेवाडी येथील अण्णा भाऊ साठे स्मारकाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी समितीने केली आहे. हे स्मारक पूर्ण होण्यास १० वर्षे लागली़
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आद्यक्रांतिगुरू वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करून वीर लहुजी वस्ताद यांचे साडेपाच एकर जमिनीमध्ये अतिभव्य स्मारक संगमवाडी येथे साकारण्याचे आश्वासन दिले. बारा वर्षांपासून वीर लहुजी वस्ताद साळवे राष्टÑीय स्मारक समिती व दलित स्वयंसेवक संघ आणि मित्र संघटना यांच्या लढ्याला यश आले. संपूर्ण महाराष्टÑात आज समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात जागृती झाली. युवक, महिलांचा यामध्ये सहभाग होणे गरजेचे आहे. पुढील काळात जाणीव निर्माण करणे, सहभाग वाढविणे हे दलित स्वयंसेवक संघाचे मुख्य लक्ष्य आहे.

Web Title:  Attempts to destroy customs, traditions, superstitions - Dadasaheb Sonawane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.