SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 08:05 PM2023-06-06T20:05:07+5:302023-06-06T20:07:01+5:30

राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी सायंकाळी डॉ. सुरेश गोसावी यांच्या  नियुक्तीची अधिकृत घोषणा केली...

Appointment of Dr. Suresh Gosavi as Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University | SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती 

SPPU: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती 

googlenewsNext

पुणे : डॉ. सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंगळवारी सायंकाळी डॉ. सुरेश गोसावी यांच्या  नियुक्तीची अधिकृत घोषणा केली. 
      
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू शोध आणि निवड समितीने पुणे विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक  प्रा. सुरेश गोसावी, पुणे विद्यापीठाच्या  वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर, पुणे विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा.अविनाश कुंभार, भौतिकशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. संजय ढोले आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. विजय फुलारी या पाच उमेदवारांची राज्यपालांकडे शिफारस केली होती. दि. २६ मे रोजी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या.  कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.
           
डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. गोसावी यांनी एमएस्सी. पीएच. डी. पदवी मिळवली असून  त्यांनी विविध विषयांमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत. तर प्लाझ्मा पॉलिमरायझेशन वापरून लिथोग्राफी आणि नमुना हस्तांतरण, ड्राय इलेक्ट्रॉन बीम संश्लेषण, मल्टी-इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी सिस्टम डिझाइन, नॅनोमटेरियल्स, नॅनोटेक्नॉलॉजी मायक्रो फ्लुइड क्स, सॉफ्ट लिथोग्राफी हे त्यांच्या संशोधनाचे विषय आहेत.

Web Title: Appointment of Dr. Suresh Gosavi as Vice-Chancellor of Savitribai Phule Pune University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.