पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सुभाष पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 05:50 AM2018-02-18T05:50:54+5:302018-02-18T05:51:06+5:30

पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत अ‍ॅड. सुभाष पवार हे बहुमताने निवडून आले. उपाध्यक्षपदी अ‍ॅड़ भूपेंद्र गोसावी आणि अ‍ॅड़ रेखा करंडे यांनी निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी झालेल्या चौरंगी लढतीत अ‍ॅड. सुभाष पवार  यांनी सर्वाधिक ३ हजार ४७० मते मिळाली.

Adv. President of Pune Bar Association Subhash Pawar | पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सुभाष पवार 

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. सुभाष पवार 

googlenewsNext

पुणे : पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत अ‍ॅड. सुभाष पवार हे बहुमताने निवडून आले. उपाध्यक्षपदी अ‍ॅड़ भूपेंद्र गोसावी आणि अ‍ॅड़ रेखा करंडे यांनी निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी झालेल्या चौरंगी लढतीत अ‍ॅड. सुभाष पवार  यांनी सर्वाधिक ३ हजार ४७० मते मिळाली.

उपाध्यक्ष पदी अ‍ॅड. भूपेंद्र गोसावी (२६८८ मते) आणि अ‍ॅड. रेखा करंडे (दांगट) (२५१२ मते) यांची निवड झाली आहे. सचिव पदासाठी अ‍ॅड़ संतोष शितोळे २ हजार ५३० आणि अ‍ॅड. लक्ष्मण घुले २ हजार १५८ मते मिळवून विजयी झाले. खजिनदार पदी प्रतापराव मोरे (३४५१ मते) यांची निवड झाली आहे. हिशेब तपासणीसपदी अ‍ॅड़ सुदाम मुरकुटे (२५६३ मते) यांची निवड झाली आहे. 

 कार्यकारिणी सदस्यपदी चेतन औरंगे, समीर भुंडे, अशिष गवारे, पंजाब जाधव, गणेश लेंडे, लक्ष्मी माने, प्रियदर्शनी परदेशी, योगेश पवार, रमेश राठोड आणि रफिक शेख या १० जणांची यापूर्वीच सर्वानुमते निवड झाली होती.

पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणूकीसाठी शनिवारी  सकाळी ८ वाजता मतदानास सुरूवात झाली. यंदा प्रथमच या निवडणुकीत सर्वाधिक ५ हजार ४४९ वकिलांनी मतदानाचा हक्क बजावला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे निवडणूक सुरळीतपणे पार पडली. सलग चौथ्या वर्षी बारच्या निवडणूकीसाठी इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशिनचा वापर करण्यात आला. सिग्नल सर्किटचे अजित गावडे आणि सहका-यांनी ईव्हीएम व्यवस्था पाहिली. पुणे जिल्हा बार असोसिशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड़ एन.डी.पाटील यांनी निवडणूकीसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. अ‍ॅड. शिरीष शिंदे, अ‍ॅड. श्रीकांत आगस्ते,अ‍ॅड. हेमंत गुंड, अ‍ॅड.अभिजित भावसार, अ‍ॅड.सुप्रिया कोठारी, अ‍ॅड. अमोल जोग, अ‍ॅड. काळूराम भुजबळ आणि अ‍ॅड. रवि पवार यांनी उपमुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

Web Title: Adv. President of Pune Bar Association Subhash Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.