पुण्यातील शाहीर अमर शेख चाैकात पुन्हा अपघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 08:50 AM2019-03-11T08:50:39+5:302019-03-11T08:52:02+5:30

जुन्या बाजाराजवळील शाहीर अमर शेख चाैकात काल रात्री पुन्हा एक अपघात झाला आणि गेल्या वर्षीच्या 5 ऑक्टाेबरची सर्वांना आठवण झाली.

accident in shahir amar shekh chowk again | पुण्यातील शाहीर अमर शेख चाैकात पुन्हा अपघात

पुण्यातील शाहीर अमर शेख चाैकात पुन्हा अपघात

Next

पुणे : जुना बाजाराजवळील शाहीर अमर शेख चाैकात काल रात्री पुन्हा एक अपघात झाला आणि गेल्या वर्षीच्या 5 ऑक्टाेबरची सर्वांना आठवण झाली. काल रात्री उशीरा अवजड वाहनांना या भागातून जाण्यास मनाई असताना एक माेठा ट्रक या चाैकात आला यावेळी अवजड वाहनांना प्रतिंबध घालण्यासाठी लावण्यात आलेला लाेखंडी खांब ट्रकवर पडला. याच वेळी मागून येणाऱ्या वाहनांवरदेखील या खांबाचा काही भाग पडल्याने रिक्षासह अनेक वाहनांचे माेठे नुकसान झाले. यावेळी माेठ्याप्रमाणावर गर्दी झाली हाेती. 

गेल्या वर्षी 5 ऑक्टाेबर राेजी जुना बाजार जवळील शाहीर अमर शेख चाैकात रेल्वेच्या हद्दीतील अजस्त्र हाेर्डिंग काढण्यात येत असताना ते चुकीच्या पद्धतीने काढण्यात येत असल्याने ते चाैकात सिग्नलला उभ्या असणाऱ्या वाहनांवार काेसळले. यात सिग्नलला उभ्या असणाऱ्या अनेकांचे प्राण गेले तर काहीजण गंभीर जखमी झाले. कालची घटना त्याच चाैकात घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण हाेते. मध्यरात्री या चाैकातून ट्रक जात असतानात पुलासमाेर असलेला लाेखंडी खांब ट्रकवर पडला. यावेळी मागून येणाऱ्या वाहनांवर देखील हा खांब पडल्याने काही वाहनांचे तुकसान झाले. अवजड वाहनांना या ठिकाणी प्रतिबंध असताना जवळचा मार्ग म्हणून ट्रकचालक या ठिकाणाहून ट्रक पुढे नेण्याचा प्रयत्न करत हाेता. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याने वाहनांचे माेठे नुकसान झाले. 


 

Web Title: accident in shahir amar shekh chowk again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.