दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या हातांनी घडवला ३० फुटी 'तिरंगा'; साकारली अनोखी कलाकृती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 03:03 PM2023-08-17T15:03:37+5:302023-08-17T15:05:21+5:30

सर्व विद्यार्थी, पालक वर्ग आणि परिवारातील सदस्य यांचा सहभाग होता...

30 feet tricolor 'created' by the hands of visually impaired students; A unique piece of art | दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या हातांनी घडवला ३० फुटी 'तिरंगा'; साकारली अनोखी कलाकृती

दृष्टिहीन विद्यार्थ्यांच्या हातांनी घडवला ३० फुटी 'तिरंगा'; साकारली अनोखी कलाकृती

googlenewsNext

पुणे : देशाच्या स्वातंत्र्यादिनाच्या ७६ व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात १५० अंध मुलांनी ३० फुटी तिरंगा त्यांच्या हाताचे ठसे उमटवून तयार केला होता. त्यामध्ये त्यांचे सर्व विद्यार्थी, पालक वर्ग आणि परिवारातील सदस्य यांचा सहभाग होता.

कोरेगाव परिसरातील अंध मुलांच्या शाळेत हा उपक्रम राबविण्यात आला होता. यावेळी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गाऊन झाली. यानंतर तोच झेंडा तळजाई येथील क्रिकेटच्या मैदानावर मांडून सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून सलामी देण्यात आली.

या उपक्रमासाठी सर्व विद्यार्थी आणि शाळेचे संचालक कृष्णा शेवाळे आणि शिक्षिका हुमा शाह इतर कर्मचारी वर्ग यांनी प्रयत्न घेतले. यामधून भारत मातेला एक वेगळ्या प्रकारे सलामी देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे कलाविष्कार संस्थेच्या संचालिका गिरिजा कोंडे देशमुख यांनी सांगितले.

Web Title: 30 feet tricolor 'created' by the hands of visually impaired students; A unique piece of art

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.