पार्सलमध्ये ड्रॅग असल्याचे सांगून महिलेला 2 लाखांचा गंडा; तुम्ही 'अशी' घ्या काळजी

By भाग्यश्री गिलडा | Published: September 3, 2023 04:11 PM2023-09-03T16:11:01+5:302023-09-03T16:11:10+5:30

कारवाई टाळण्यासाठी तुमचे बँक खाते व्हेरिफाय करण्याचे सांगून सायबर भामट्यांनी एक लिंक पाठवली

2 lacs to woman for saying there was a drag in the parcel; You take care of 'such' | पार्सलमध्ये ड्रॅग असल्याचे सांगून महिलेला 2 लाखांचा गंडा; तुम्ही 'अशी' घ्या काळजी

पार्सलमध्ये ड्रॅग असल्याचे सांगून महिलेला 2 लाखांचा गंडा; तुम्ही 'अशी' घ्या काळजी

googlenewsNext

पुणे : तुमच्या नावाने तैवानवरून मुंबई येथे पाठवलेल्या पार्सलमध्ये अंमली पदार्थ सापडल्याचे सांगून ५५ वर्षीय महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार कात्रज परिसरात घडला आहे. महिलेला अनोळखी क्रमांकावरून आलेल्या फोनवर कुरिअर ऑफिसमधून बोलत असल्याचे सांगत तुम्ही पाठवलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स असल्याचे सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेला अज्ञाताने २४ जुलै २०२३ रोजी संपर्क साधला. तुमच्या नावाने मुंबई येथून तैवानला पार्सल पाठवण्यात आले आहे, त्यामध्ये अंमली पदार्थ आहेत असे सांगितले. याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी तुमचे बँक खाते व्हेरिफाय करण्याचे सांगून सायबर भामट्यांनी एक लिंक पाठवली. लिंकवर क्लिक केल्याने रिमोट ऍक्सेस मिळवून सायबर चोरट्यांनी १ लाख ९९ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणी अज्ञात मोबाईलधारकाच्या विरोधात भरती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पोलीस निरीक्षक पुराणिक पुढील तपास करत आहे.

अशी घ्या काळजी

- तुम्ही पार्सल पाठवले नसल्यास घाबरू नका.
- असा फोन आल्यास सर्वात आधी सायबर पोलिसांना कळवा.
- कोणतेही ॲप्लिकेशन डाऊनलोड करू नये.
- कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.

Web Title: 2 lacs to woman for saying there was a drag in the parcel; You take care of 'such'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.