जवानांसाठी आपुलकीचा गोड ठेवा!; पुण्यातील गणेश मंडळांचा पुढाकार : १०० किलो तिळगूळ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 12:14 PM2018-01-09T12:14:49+5:302018-01-09T12:19:28+5:30

देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून १०० किलो तिळगूळ सैनिकांना पाठवण्यात आला.

100kg tilgul for soldiers from Pune Ganesh mandals | जवानांसाठी आपुलकीचा गोड ठेवा!; पुण्यातील गणेश मंडळांचा पुढाकार : १०० किलो तिळगूळ रवाना

जवानांसाठी आपुलकीचा गोड ठेवा!; पुण्यातील गणेश मंडळांचा पुढाकार : १०० किलो तिळगूळ रवाना

Next
ठळक मुद्देजातीपातींवरून समाजात जे वाद होताना दिसत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट : गायत्री खडकेते सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत : हेमंतराजे मावळे

पुणे : स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून १०० किलो तिळगूळ सैनिकांना पाठवण्यात आला. ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देत तिळगुळाचे पूजन करण्यात आले. या उपक्रमात २५ मंडळांनी सहभाग होत आपुलकीचा ठेवा सैनिकांपर्यंत पोहोचवून देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीवच जणू पुणेकरांना करून दिली. 
शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सैनिक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 
या वेळी नगरसेविका अ‍ॅड. गायत्री खडके, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. बिपीन पाटोळे, शाहीर हेमंतराजे मावळे, मेहुणपुरा मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे, वीरपत्नी दीपाली मोरे, स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष मदनसिंह राजपूत उपस्थित होते. 
स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन पुणे, संयुक्त प्रसाद मित्रमंडळ, नेने घाट गणेशोत्सव मंडळ, कडबे आळी गणेशोत्सव मंडळ, हसबनीस बखळ मित्र मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, त्वष्टा कासार मंडळ आणि इतर सार्वजनिक मंडळांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. 
गायत्री खडके म्हणाल्या, की सध्या जातीपातींवरून समाजात जे वाद होताना दिसत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांनी कधीही जातपात मानली नाही. आपल्या देशात जातींवरून भांडणे होत असल्याचे कळल्यावर त्यांना खूप वाईट वाटेल. सैनिकांना तिळगूळ पाठवताना ‘आम्ही जातपात न मानता भारतीय म्हणून एकजुटीने राहू,’ असा विश्वास देणे गरजेचे आहे.
बिपीन पाटोळे म्हणाले, ‘सैनिकांप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. तिळगुळाचा प्रसाद सैनिकांसाठी लाखमोलाचा आहे.’ 
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, ‘आपण सैनिकांना तिळगूळ पाठवतो, आजूबाजूच्या लोकांनाही ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ असे सांगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याच देशात धर्मासाठी, जातीसाठी लढत असू तर सैनिकांच्या लढ्याचा काहीच फायदा होणार नाही. ते देशाच्या सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत.’ गिरीश सरदेशपांडे, महेश काटदरे, नितीन पंडित, अजित परांजपे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: 100kg tilgul for soldiers from Pune Ganesh mandals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे